“संजय लेले लहानाचा मोठा आमच्यासमोरच झाला. या सोसायटीत वाढला. अवघं आयुष्य डोंबिवलीत गेलं. माझ्या मुलाच्या वयाच्या असलेल्या संजयची बातमी पाहून आमच्याही पायाखालची जमीन सरकली”मध्ये ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली पश्चिम येथील तीन पर्यटकांचा मृत्यू झाला. नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. संजय लेले यांच्या जिवलगांनी फेसबुकवरुन त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.कौशिक लेले यांनी फेसबुकवरुन पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. “पहलगाम हल्ला… पर्यटकांवर हल्ला… मराठी पर्यटक… डोंबिवलीचे पर्यटक… नावे – संजय लेले, हेमंत जोशी, अतुल मोने… आईचा फोन, संजयला गोळी लागली आहे… एक एक बातमी, एकेक तपशील अधिकाधिक विदीर्ण करणारा. माझा चुलत भाऊ संजय, मित्र हेमंत आणि त्यांचा भाऊ… एकमेकांची आते-मामे-चुलत भावंड… एकाच कुटुंबावर तिहेरी घाला. काही शब्दच नाहीत पुढे लिहायला.” अशा भावना कौशिक लेले यांनी व्यक्त केल्या आहेत.










