पुढील 72 तास महत्त्वाचे, पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्व दौरे रद्द, दहशतवाद्यांचा होणार खात्मा.

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले, ज्यात धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. या घटनेनंतर देशात संतापाचे वातावरण आहे. अमित शहा यांनी तातडीने जम्मू काश्मीरला भेट दिली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. पुढील ७२ तास महत्वाचे आहेत. जम्मू काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी दहशतवादी हल्ला पर्यटकांवर करण्यात आला. हेच नाही तर धर्म विचारून दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या. महिला आणि लहान मुलांसमोरच पुरूषांवर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. या हल्ल्यादरम्यानचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. यावरून हे स्पष्ट होतंय की, हा हल्ला किती जास्त भयानक होता. हल्ल्याची माहिती मिळताच अमित शहा हे तातडीने जम्मू काश्मीरकडे रवाना झाले. आज सकाळी हल्ल्यात जखमी झालेल्यांची त्यांनी भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. त्यापूर्वीच दुपारी तीन तास तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांची बैठक झालीये. दहशतवाद्यांची आता खैर नसल्याचे स्पष्ट होतेय पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याबद्दल कळताच विदेशी दाैरा रद्द करून भारतात दाखल झाले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पहलगामच्या प्रत्येक अपडेटवरून लक्ष ठेऊन आहेत.पुढील ७२ तास अत्यंत महत्वाचे आहेत. नरेंद्र मोदी यांनी २६ तारखेपर्यंतचे त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केली आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून याबद्दलची माहिती ही देण्यात आलीये. पहलगाम हल्ल्यानंतर नेमके काय करायचे आणि दहशतवाद्यांच्या मुसक्या कशा आवळायच्या याबद्दल विविध बैठका सुरू आहेत. याच सर्व पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांनी त्यांचे २६ तारखेपर्यंतचे सर्व कार्यक्रम रद्द केली आहेत.विदेशातील दाैरा अर्धवट सोडून नरेंद्र मोदी हे काल रात्रीच भारतात दाखल झाले. अजिबात वेळ न घालता त्यांनी विमानतळावरच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे देखील उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख आणि संरक्षण मंत्रालयाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामुळे पुढील ७२ तास अत्यंत महत्वाचे असणार आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.