
शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीटभट्टी कामावरील कामगार निवांतपणे गार हवेत मोकळ्या जागांमध्ये झोपलेले होते. या कुटुंबातील किशोर व काळू हे दोघे भाऊ गारव्यासाठी मातीच्या ढिगाऱ्यावर झोपले होते.बागलाण तालुक्यातील मुंगसे येथे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास वीट भट्टीसाठी राख घेऊन आलेला ट्रक मागे घेताना त्याखाली सापडून मातीच्या ढिगाऱ्यावर झोपलेल्या दोघा सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू झाला.याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील मुंगसे येथे महेश संजय जगदाळे यांच्या वीटभट्टीच्या कामासाठी धुळे-शिरपूर येथील आदिवासी, कोकणा कुटुंबे कामासाठी आली आहेत. शनिवारी (दि. १२) मध्यरात्रीच्या सुमारास वीटभट्टी कामावरील कामगार निवांतपणे गार हवेत मोकळ्या जागांमध्ये झोपलेले होते. या कुटुंबातील किशोर पुण्या कोकणी (१९) व काळू पुण्या कोकणी (१७) हे दोघे सख्खे भाऊ गारव्यासाठी मातीच्या ढिगाऱ्यावर झोपले होते.
मध्यरात्रीच्या सुमारास एक ट्रक राख घेऊन आला. चालक राख खाली करण्यासाठी ट्रक मागे घेत असताना मातीवर झोपलेल्या दोघा भावांच्या अंगावरून तो गेल्याने दोघे चिरडले गेले. त्यांची किंचाळी ऐकून कुटुंबीय जागे झाले. अपघात झाल्याचे पाहून ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला. दोघा भावांना पहाटे तीन वाजेच्या सुमारास एका वाहनाने सटाणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
मृत तरुणांच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. सटाणा ग्रामीण रुग्णालयात दुपारी शवविच्छेदन करण्यात आले.वीट भट्टीवर ट्रकद्वारे दररोज राख आणली जाते. ट्रक आल्यानंतर चालक हॉर्न वाजवून मजुरांना सूचना देतो. मात्र, शनिवारी मध्यरात्री ट्रक मागे घेताना चालकाने हॉर्न वाजवला नाही. परिणामी, ट्रक आल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. हॉर्न वाजविला असता तर दोघा भावांचा जीव वाचला असता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Video Player
00:00
00:00