मित्रांसोबत रविवारी तलावात गेला, काही कळायच्या आत अनर्थ घडला.

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात दुःखद घटना घडली. मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.वागळे इस्टेटमधील रायलादेवी तलावामध्ये बुडून साहिल घोरपडे (१८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा तलावातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.

साठेनगरमध्ये राहणारा साहिल हा रविवारी सायंकाळी मित्रांसोबत रायलादेवी तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.या पथकांनी अंडरवॉटर टेलिस्कोप कॅमेरा आणि थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने साहिलचा तलावात अंदाजे दीडतास शोध घेतला.

परंतु, अंधार पडल्याने शोधकार्यामध्ये अडथळा येऊ लागल्याने तात्पुरत्या स्वरुपात शोधकार्य थांबवण्यात आले.पुन्हा रात्री उशिरा १२.३० वाजता शोधकार्य सुरु करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर साहिल याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.