रविवारी मोठ्या बहिणीचा होता साखरपुडा, शनिवारी छोटीची सापडली बॉडी, खेडमधील तरूणीच्या हत्येचं गूढ उकललं.

पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. घरात मोठ्या बहिणीचा साखरपुड्याला एक दिवस बाकी असताना छोटीचा मृतदेह सापडला होता. या हत्येचे गूढ उकलले असून काय घडलं ते जाणून घ्या. पुण्यातील खेड येथे हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बहिणीच्या साखरपुड्याची तयारी सुरू असताना घरावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कोणी विचारही केला नव्हता असं काही घडेल, बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृचदेह भीमा नदीच्या पात्राच सापडला होता. मात्र पोलिसांना तपासाची सूत्र फिरवल्यावर सत्य समोर आले आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला पोलीस कोठडीसुद्धा सुनावण्यात आलीय.मांजरेवाडी (ता. खेड) येथे अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी सापडला होता. पोलिसांच्या तपासात खून करून तिचा मृतदेह नदीत टाकून दिल्याचे उघड झाले. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत आरोपीला अटक केली.

नवनाथ कैलास मांजरे (वय २९, रा. मांजरेवाडी धर्म, ता. खेड) असे आरोपीचे नाव असून, न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात शिक्षण घेत होती. शुक्रवारी (ता. ११) सकाळी ती महाविद्यालयात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास घरी जाण्यासाठी पाबळ रस्त्यावर थांबली असता, आरोपी नवनाथ मांजरे तिथे आला. घरी यायचे का, असे म्हणून त्याने तिला दुचाकीवर बसविले. त्यानंतर, मला उसाच्या शेताला पाणी द्यायचे आहे, असे सांगून त्याने तिला मांजरेवाडी पिंपळ, मलघेवाडी या रस्त्याने त्याच्या नदीकाठच्या उसाच्या शेतात नेले.

आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेने नकार दिल्यामुळे आरोपीने तिच्या डोक्यात दगड टाकला. त्यानंतर तिचा मृतदेह ओढत नेऊन शेतालगतच असणाऱ्या भीमा नदीच्या पात्रात टाकला. दरम्यान, ‘मुलीवर लैंगिक अत्याचार झाले का नाही, याबाबत शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे,’ अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक स्नेहल राजे यांनी दिली.दरम्यान, रविवारी (ता. १३) पीडित मुलीच्या मोठ्या बहिणीचा साखरपुडा होणार होता. त्यामुळे सर्व कुटुंब आनंदात होते. मात्र, आदल्या दिवशीच छोट्या बहिणीचा खून झाल्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.