भाजपच्या आमदारांवर पक्षातलेच नेते नाराज, कोणत्या पक्षाचे आहात विचारला सवाल,नेमकं प्रकरण काय.

भाजपच्या आमदारांवर पक्षातलेच नेते नाराज असून कोणत्या पक्षाचे आहात अशा प्रकारचा प्रश्नच विचारला आहे. आपण कुणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे असा सल्लाही भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला.भाजपाच्या कोट्यातून कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे नक्की भाजपाचे आहेत? की शिवसेनेचे? हेच सध्या समजत नाही, अशी खदखद भाजपाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली. तर आपण कुणामुळे निवडून आलो, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असा मोलाचा सल्ला भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आमदार म्हात्रेंना दिला. त्यामुळं भाजपाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंवर बदलापूरचे भाजपा कार्यकर्तेच नव्हे, तर आमदारही नाराज असल्याचं समोर आलंय.

ज्ञानेश्वर म्हात्रे यांना कोकण शिक्षक मतदारसंघातून भाजपाची उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना निवडून आणण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं. मात्र म्हात्रे यांनी आजवर भाजपाच्या एकाही कार्यकर्त्याला निधी दिलेला नसून उलट जिथे भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत, अशा प्रभागांमध्येही शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनाच निधी दिला आहे, अशी जाहीर खदखद भाजपाचे बदलापूरचे माजी नगराध्यक्ष राजन घोरपडे यांनी व्यक्त केली. याबाबत आपण वरिष्ठांकडे सुद्धा ही खदखद मांडणार असल्याचं राजन घोरपडे म्हणाले. तर आपण कुणामुळे निवडून आलोय, हे त्यांनी लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागलं पाहिजे, असं म्हणत ज्ञानेश्वर म्हात्रे भाजपामुळेच निवडून आले आहेत, असं भाजप आमदार किसन कथोरे म्हणाले.

दरम्यान, याबाबत आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना विचारलं असता, मला सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते भेटायला येतात आणि मी सगळ्यांना भेटतो. मात्र तरीही मला स्थानिक राजकारणात ओढण्याचा प्रयत्न केला जात असून आपण याबाबत वरिष्ठांशी चर्चा करू, असं आमदार म्हात्रे यांनी सांगितले आहे.पुर्वाश्रमीचे शिवसैनिक 2023 मध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने कोकण शिक्षक मतदारसंघातून त्यांना उमेदवारी दिली होती. तब्बल 6000 मतांनी ते निवडून आले होते. ते पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत. बदलापूर येथील शिवभक्त विद्यामंदिर शाळेचेमुख्याध्यापक आहेत. इतर शाळांवर ते संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे बंधु वामन म्हात्रे हे शिवसेनेचे बदलापुरमधील माजी नगराध्यक्ष होते.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.