पतंगराव कदमांच्या लेकीचं निधन, भारती ताईच्या विरहात विश्वजीत कदम भाववश, गोड फोटो शेअर करत म्हणाले…

पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहेमहाराष्ट्राचे माजी वनमंत्री आणि काँग्रेसचे दिवंगत नेते पतंगराव कदम यांच्या कन्येचे निधन झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. भारतीताई महेंद्र लाड यांच्या अकाली मृत्यूने राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे. पतंगरावांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.पतंगराव कदम यांनी पुण्यात भारती विद्यापीठाची स्थापना केली होती. लाडकी कन्या ‘भारती’ यांच्या नावावरुन पतंगरावांनी या विद्यापिठाचे नामकरण केले होते. भारती लाड या रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांच्या पत्नी होत.

पतंगराव कदम यांचे सुपुत्र आणि माजी मंत्री, काँग्रेस नेते विश्वजीत कदम यांनी ‘एक्स’ सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ताईच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “माझी मोठी बहीण आदरणीय भारतीताई महेंद्र लाड यांचं निधन झाल्याचे वृत्त अतिशय दुःखद व वेदनादायी आहे. आजवरच्या वाटचालीत त्यांचं पाठबळ, प्रेम आणि स्नेह नेहमीच ऊर्जादायी राहिले. त्यांच्या निधनाने कदम व लाड परिवाराची कधीच न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

आदरणीय ताईला भावपूर्ण श्रद्धांजली.” अशा भावना विश्वजीत कदम यांनी ताईसोबत अत्यंत गोड फोटो शेअर करत व्यक्त केल्या आहेत.पतंगराव कदम यांचे 9 मार्च 2018 रोजी वयाच्या 74 व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारानंतर अवयव निकामी झाल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. पतंगराव कदम यांना चार लेकरं होती. यापैकी अभिजीत कदम यांचे यापूर्वीच निधन झाले आहे. तर आता भारती लाड यांनीही अखेरचा श्वास घेतला. भारती यांच्या पश्चात पती महेंद्र लाड, भाऊ विश्वजीत कदम, बहीण अस्मिता जगताप असा परिवार आहे. त्यांचे पती महेंद्र लाड हे रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.