
कल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली. त्यावेळी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. गडचिरोली शहरानजीकच्या नवेगाव (मुरखळा) येथे भरदिवसा महिलेची हत्या झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मयत महिला जिल्हा परिषदेची सेवानिवृत्त अधिकारी होती. खलबत्त्याने मारुन महिलेचा जीव घेतल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कल्पना केशव उंदिरवाडे (६१) असे मयत महिलेचे नाव आहे. अंगावरील दागिने तसेच असल्याने चोरी नव्हे, तर अन्य कारणाने हत्या झाल्याचा संशय आहेकल्पना उंदिरवाडे यांच्या घरी काम करणारी महिला काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्या घरी गेली. त्यावेळी त्या मृतावस्थेत आढळून आल्या. त्यांच्या शरीरावर लोखंडी रॉडने मारहाण केल्याच्या जखमा होत्या. घराचे सर्व दरवाजे उघडे होते. शिवाय टीव्हीही सुरु होता.
घरकाम करणाऱ्या महिलेने ही माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यांनी कळवल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, चामोर्शी मार्गावरील एका पेट्रोल पंपावर काम करणारा कल्पना उंदिरवाडे यांचा जावईदेखील घरी पोहचला. पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी रात्री ८ वाजता मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.कल्पना उंदिरवाडे आणि त्यांचे पती केशव उंदिरवाडे दोघेही जिल्हा परिषदेत नोकरीवर होते. केशव उंदिरवाडे यांचे काही वर्षांपूर्वीच निधन झाले, तर कल्पना तीन वर्षापूर्वी निवृत्त झाल्या. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई आणि एक दत्तक मुलगा असल्याचे सांगितले जाते.
कल्पना उंदिरवाडे यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या बोटातील ३ अंगठ्या तशाच होत्या. शिवाय अंगावरील अन्य दागिनेही सुरक्षित होते. त्यामुळे त्यांची हत्या चोरीच्या हेतूने झाली नसावी, हे स्पष्ट होते. त्यामुळे हत्या करणारा नेमका कोण आहे, तो जवळचा व्यक्ती तर नसावा ना, असाही संशय यानिमित्ताने व्यक्त केला जात आहे.पोलिस अधीक्षक नीलोत्पल, उपविभागीय पोलिस अधिकारी सूरज जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण फेगडे आणि त्यांचे सहकारी घटनेचा तपास करत आहेत.
Video Player
00:00
00:00