
पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील सीसीटिव्ही फुटेजही समोर आला आहे.पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गेलेली बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज सकाळी भीमा नदी पात्रात आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शुक्रवारी (११ एप्रिल)रोजी ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गायब झाली होती. तसेच एका तरुणासोबत ही मुलगी दुचाकीवरून जाताना सीसीटिव्हीत देखील समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सूरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. तपासणीत मुलीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. यावरून पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकून दिल्याचा संशय आहे. मुलीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. ही हत्या नेमकी का झाली? याचा तपास सुरु केला आहे.सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा