बेपत्ता तरुणीचा मृतदेह आढळल्याने पुण्यात खळबळ .

पुण्याच्या राजगुरुनर येथून बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेसंदर्भातील सीसीटिव्ही फुटेजही समोर आला आहे.पुण्याच्या राजगुरुनर येथून  बेपत्ता झालेल्या एका अल्पवयीन मुलीचा खून झाल्याची  धक्कादायक घटना समोर आली आहे. महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गेलेली बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलीचा मृतदेह आज सकाळी भीमा नदी पात्रात आढळला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी (११ एप्रिल)रोजी ही अल्पवयीन मुलगी महाविद्यालयात जाण्याचे कारण सांगून गायब झाली होती. तसेच एका तरुणासोबत ही मुलगी दुचाकीवरून जाताना सीसीटिव्हीत देखील समोर आले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सूरू केला आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भीमा नदीच्या पात्रात आढळून आला आहे. तपासणीत मुलीच्या डोक्यावर आणि तोंडावर गंभीर दुखापती आढळून आल्या आहेत. यावरून पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे. तसेच, पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह नदीत फेकून दिल्याचा संशय आहे. मुलीच्या आई-वडिलांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलिसांनी घेतली आहे. ही हत्या नेमकी का झाली? याचा तपास सुरु केला आहे.सीसीटीव्ही फुटेजमधून महत्त्वाचा पुरावा

पोलीस तपासात मुलीला दुचाकीवरून घेऊन जाणारा तरुण कोण होता, याचा शोध घेतला जात आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील माहितीच्या आधारे या मुख्य संशयिताची ओळख पटवण्यासाठी आणि हत्येचे कारण शोधण्यासाठी खेड पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत.खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुलीच्या हत्येमागील नेमके कारण आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी स्थानिक नागरिक आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे राजगुरुनगर परिसरात तणावाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी या क्रूर हत्याकांडाचा तीव्र निषेध व्यक्त केला असून, लवकरात लवकर आरोपींना पकडण्याची मागणी केली आहे.

  • Related Posts

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    भारताने पाकिस्तानला ‘ऑपरेशन सिंदूर’ मधून चोख प्रत्युत्तर दिले आहे. पहलगाममध्ये झालेल्या निष्पाप लोकांच्या नरसंहाराचा बदला आज घेण्यात आला. या यशस्वी ऑपरेशननंतर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अनेक देशांतील समकक्ष…

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    मुलीचा नातेवाईक योगेश यशवंत दूटे याच्याविरोधात अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.१२ वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी प्रेयसीला भेटायला गेलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली आहे. नवनाथ तुकाराम…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर अजित डोवाल सक्रिय, भारताच्या धडक कारवाईनंतर केले महत्वाचे काम.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    १२वीचा निकाल लागला, आनंदात प्रेयसीला भेटायला गेला अन् घात झाला; नातेवाईकांकडून तरुणाचा खून.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    आणखी मोठं काहीतरी घडण्याचे संकेत, जवानांच्या सुट्ट्या रद्द, विमानतळांवरची उड्डाणे बंद.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.

    प्रेरणा फाऊंडेशन व सत्कर्म बालकाश्रम राष्ट्रगौरव पुरस्काराने गोसेवक प्राणीमित्र रोहित महाले सन्मानित.