‘हेराल्ड’चा पाय खोलात; ६६१ कोटींच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी ईडीची नोटीस.

मुंबई व लखनऊच्या उच्चभ्रू परिसरातील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एजेएलला मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतची नोटीस बजावली.काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे प्रमुख भागधारक असलेल्या ‘यंग इंडियन’ व असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्याविरोधातील मनी लाँडरिंग चौकशीत जप्त केलेल्या दिल्ली, मुंबई व लखनऊच्या उच्चभ्रू परिसरातील ६६१ कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी केंद्र सरकारने पुढचे पाऊल टाकले आहे. सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एजेएलला मालमत्ता ताब्यात घेण्याबाबतची नोटीस बजावली. याद्वारे सोनिया व राहुल गांधी यांना खिंडीत गाठले आहे,‘दिल्लीतील हेराल्ड हाऊस, मुंबईतील वांद्रे येथील आणि लखनऊमधील बिशेश्वर नाथ मार्गावरील एजेएल इमारतींवर शुक्रवारी रात्री या नोटिसा लावण्यात आल्या.

वांद्रे येथील हेराल्ड हाऊसच्या सातव्या, आठव्या आणि नवव्या मजल्यावर असलेल्या जिंदाल साउथ वेस्ट प्रोजेक्ट्स लिमिटेडलाही नोटीस बजावण्यात आली,’ अशी माहिती ईडीने शनिवारी दिली. ‘जागा रिकामी करा किंवा बाजारभावानुसार भाडेदर ईडीला द्या,’ असे या नोटिशीमध्ये म्हटले आहे.मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम (८) आणि नियम ५ (१) याचा आधार घेऊन ईडीने ही कारवाई केली आहे.यानुसार ईडीने जप्त केलेल्या आणि प्राधिकरणाने पुष्टी केलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची ही प्रक्रिया आहे. या स्थावर मालमत्ता ईडीने नोव्हेंबर २०२३मध्ये जप्त केल्या होत्या. हा मनी लाँडरिंग खटला एजेएल आणि यंग इंडियनविरुद्ध आहे. नॅशनल हेराल्ड हे एजेएलद्वारे प्रकाशित केले जाते आणि ते यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीचे आहे. सोनिया आणि राहुल गांधी हे यंग इंडियनचे प्रमुख भागधारक आहेत. दोघांकडे याचे प्रत्येकी ३८ टक्के शेअर आहेत. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र सन १९३८मध्ये सुरू केले होते. नॅशनल हेराल्डप्रकरणी गांधी मायलेकांना जामीन मंजूर झाला आहे.

■ यंग इंडियन आणि एजेएलच्या मालमत्तेचा वापर १८ कोटी रुपयांच्या बनावट देणग्या, ३८ कोटी रुपयांचे बनावट आगाऊ भाडे आणि २९ कोटी रुपयांच्या बनावट जाहिरातींच्या स्वरूपात अवैध उत्पन्नासाठी करण्यात आला, असा ईडीचा आरोप आहे. ■ सन २०१०मध्ये, यिल नावाची कंपनी स्थापन झाली. या कंपनीने एजेएलचे किमान ९० कोटी रुपयांचे दायित्व फक्त ५० लाख रुपयांमध्ये विकत घेतले आणि या संस्थेच्या मालमत्तेवर (कोट्यवधी रुपयांचे) नियंत्रण मिळवले, असा आरोपही ईडीने केला.■ नॅशनल हेराल्ड हे असोसिएटेड जर्नल्स लिमिटेडद्वारे प्रकाशित
■ यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडकडे मालकी ■ सोनिया आणि राहुल गांधी हे यंग इंडियनचे सर्वांत मोठे भागधारक

  • Related Posts

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत शरद पवार गटाने सर्व 21 जागा मोठ्या फरकाने जिंकत अजित पवार गटाचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांचा मोठा पराभव केला. जिल्ह्यात एकीकडे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार…

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

     जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सोशल मीडियावर मत व्यक्त केल्यानंतर गायक नेहा सिंग राठोड वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    भारतीय वृत्तवाहिन्यांवर पाकिस्तानातील पत्रकार व विश्लेषकांना आमंत्रित करण्यावर तात्काळ बंदी आणावे : ॲड. जमील देशपांडे

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    अजित पवार गटाला ‘दे धक्का’, आबांकडून मामांचा पराभव; आदिनाथ कारखान्याच्या अध्यक्षपदी नारायण पाटील

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    गायक नेहा सिंह राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.

    पाकिस्तानला दणका, चीनची वाढली चिंता; भारताच्या पॉवरफुल निर्णयानं सागरी समीकरणं बदलली.