
नागालँड गुंतवणूक आणि विकास प्राधिकारणातील (आयडीएएन) महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारिरीक शोषण केल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.नागालँड गुंतवणूक आणि विकास प्राधिकारणातील (आयडीएएन) महिला कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारिरीक शोषण केल्याप्रकरणी आयएएस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी चार सदस्यीय विशेष तपासणी पथक स्थापन (एसआयटी) करण्यात आले आहे.अबू मेथा असे गुन्हा दाखल झालेल्या आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. ते ‘आयडीएएन’चे अध्यक्ष आहेत. नागालँड महिला आयोगाच्या अध्यक्षा नगिन्येइन कोनयाक यांनी राज्याचे पोलिस महासंचालकांना १७ मार्च रोजी पत्र लिहून लेखी तक्रार दिली होती. मेथा हे मुख्यमंत्री नफ्यू रिओ यांचे सल्लागार देखील आहेत. त्यामुळे या प्रकरणात महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या आरोपांची तीव्रता वाढली आहे.
मेथी हे ‘आयडीएएन’चे सहसचिव देखील आहेत.पोलिस महासंचालकांकडे तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पीडित महिलांचा जबाब नोंदविण्यास सुरुवात झाली आहे. वेतनवाढ आणि अन्य लाभ मिळविण्यासाठी या महिलांचे लैंगिक व मानसिक शोषण केल्याचा आरोप आहे. दरम्यान, आयएएस अधिकारी मेथी यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. पोलिस उपअधीक्षक दर्ज्याच्या महिला अधिकाऱ्याने चौकशीअहवाल वरिष्ठांकडे सादर केला आहे.महिला कर्मचारी अत्याचार प्रकरणी चौकशीसाठी ‘एसआयटी’ची स्थापन करण्यात आली आहे. यात चार अधिकाऱ्यांचा समावेशआहे.
दरम्यान, अबू मेथी यांनी चार एप्रिल रोजी ‘आयडीएएन’च्या जबाबदाऱ्यांपासून दूर हटविण्यात आले आहे.मेथी यांच्यावर शोषणाचे पहिल्यांदाच आरोप झालेले नाहीत. यापूर्वी २०२१मध्ये नोकलाड जिल्ह्यात उपायुक्त म्हणून कार्यरत असताना दोन अल्पवयीन मुलींचे त्यांनी शासकीय निवासस्थानी शोषण केल्याचा आरोप झाला होता. यात त्यांच्याविरोधात तुएनसांग येथील विशेष न्यायालयातआरोपपत्र दाखल झाले होते.
Video Player
00:00
00:00