
मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला आणि मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांवर संताप व्यक्त केलाय. अशा नराधमांचा खून करायला हवा, असंही त्या म्हणाल्या.मुंबई: महिलांवर होणारे अत्याचार हा मुद्दा कालही होता, आजही आहेच. गेल्या काही वर्षात महिलांवर तसंच लहान मुलांवर होणारे शाररीक , मानसिक अत्याचार प्रचंड वाढताना दिसतायतय. यात हादरवणारी एक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचार करणारे, त्यांचं शोषण करणारे हे त्यांच्या जवळचेच असतात. कधी काका,मामाकडून अत्याचार झाल्याचं ऐकायला मिळतं,तर नराधम बाप आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करतो..अशा घटना समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यावर आता अनेक अभिनेत्रींनी संताप व्यक्त केलाय. मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री, निर्मात्या अलका कुबल आठल्ये यांनी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा खून करायला हवा, असं म्हणत राग व्यक्त केलाय.
जळगावातील खानदेश करिअर महोत्सवाला अलका कुबल यांनी हजेरी लावली, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अलका कुबल नेहमीच सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होत आल्या आहेत.महिला-मुलींवर होणाऱ्या अत्यारांसाठी आपण पोलिसांना दोष देतो. पण यासाठी आजुबाजेचे लोकही जबाबदार आहेत. बऱ्याचवेळा आपण बघतो की या घटना घरातच घडत असतात. कुठे चुलत भाऊ असतो, कुठे आत्येभाऊ असतो. वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते. मला असं वाटलं या चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता. इतका संताप येतो .यासाठी आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला पाहिजे. जशा काही सौदी सारख्या देशांत आहे. लोकांना कायद्याची भीती वाटायला पाहिजे.