त्या नराधम बापानं पोटच्या चारही मुलींवर बलात्कार केला… अलका कुबल यांचा संताप.

मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला आणि मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांवर संताप व्यक्त केलाय. अशा नराधमांचा खून करायला हवा, असंही त्या म्हणाल्या.मुंबई: महिलांवर होणारे अत्याचार हा मुद्दा कालही होता, आजही आहेच. गेल्या काही वर्षात महिलांवर तसंच लहान मुलांवर होणारे शाररीक , मानसिक अत्याचार प्रचंड वाढताना दिसतायतय. यात हादरवणारी एक गोष्ट म्हणजे मुलींवर अत्याचार करणारे, त्यांचं शोषण करणारे हे त्यांच्या जवळचेच असतात. कधी काका,मामाकडून अत्याचार झाल्याचं ऐकायला मिळतं,तर नराधम बाप आपल्या पोटच्या पोरीवर बलात्कार करतो..अशा घटना समाजात दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. यावर आता अनेक अभिनेत्रींनी संताप व्यक्त केलाय. मराठी सिनेइंडस्ट्रीतल्या लोकप्रिय आणि ज्येष्ठ अभिनेत्री, निर्मात्या अलका कुबल आठल्ये यांनी मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचा खून करायला हवा, असं म्हणत राग व्यक्त केलाय.

जळगावातील खानदेश करिअर महोत्सवाला अलका कुबल यांनी हजेरी लावली, त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्या बोलत होत्या. अलका कुबल नेहमीच सामाजिक मुद्द्यावर व्यक्त होत आल्या आहेत.महिला-मुलींवर होणाऱ्या अत्यारांसाठी आपण पोलिसांना दोष देतो. पण यासाठी आजुबाजेचे लोकही जबाबदार आहेत. बऱ्याचवेळा आपण बघतो की या घटना घरातच घडत असतात. कुठे चुलत भाऊ असतो, कुठे आत्येभाऊ असतो. वडील आपल्या चार मुलींवर बलात्कार करत होते. मला असं वाटलं या चार मुलींनी आपल्या बापाचा खून करायला पाहिजे होता. इतका संताप येतो .यासाठी आपल्याकडे कडक शिक्षा व्हायला पाहिजे. जशा काही सौदी सारख्या देशांत आहे. लोकांना कायद्याची भीती वाटायला पाहिजे.

नाही तर चार वर्षे आत आणि नंतर पुन्हा बाहेर आल्यानंतर तेच होणार असेल तर याला काहीच अर्थ नाहीये. या घटना होताना समाजातील लोकांनी या मुलींना वाचवण्यासाठी पुढं येणं गरजेचं आहे, असंही त्यांनी म्हटलं.पुण्यात एका मुलीवर हल्ला होत असताना दोन मुलं धावत आली आणि त्यांनी तिला वाचवलं…अशा मुलांचं कौतुक वाटत, असंही अलका कुबल यांनी म्हटलं.अलका कुबल यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलं आहे.

  • Related Posts

    दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्ताने निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून यावल वनविभागा कडन एकुण ३९ मचान , यावल वनविभागा मार्फत तयार करण्यात आलेले आहेत.

    दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्त यावल वनविभागाचे उप वनसंरक्षक जमीर शेख, व सहाय्यक वनसंरक्षक चोपडा प्रथमेश हाडपे यांच्या संकल्पनेतून यावल वनविभागातील चोपडा वनक्षेत्र पासुन ते रावेर वनक्षेत्र पर्यंत ठिकठिकाणी…

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची इच्छा असलेल्या तांत्रिक शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांसाठी ही एक महत्वाची संधी आहे. भारतीय सैन्याने टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्स…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्ताने निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून यावल वनविभागा कडन एकुण ३९ मचान , यावल वनविभागा मार्फत तयार करण्यात आलेले आहेत.

    दिनांक १२.५.२०२५ रोजी बुध्द पौर्णिमा निमित्ताने निसर्ग अनुभवाच्या माध्यमातून यावल वनविभागा कडन एकुण ३९ मचान , यावल वनविभागा मार्फत तयार करण्यात आलेले आहेत.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    भारतीय सैन्यात अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी — TGC-142 कोर्ससाठी अर्ज सुरू.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त गणपतदादा पोळ यांचे खेळाडूंना मार्गदर्शन व गणवेश वाटप.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.

    शहीद जवान राकेश शिंदे यांच्या मातेस मांडवेदिगर येथे २ हेक्टर शेतीयोग्य जमीन प्रदान.