गायत्रीचा नाद सोड रे बाबा, माऊलीची विनवणी, लेक जुमानेना; जो पदर धरुन लहानाचा मोठा, त्यानेच जीव घेतला.

संशयित आरोपी रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते. याची कुणकुण भीमाबाई यांना लागल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोट तालुक्यातील सिन्नूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाने आपल्या आईची निर्घृण हत्या केली. आरोपीने शेतातच आईचा साडीने गळा आवळून खून केला आहे. या प्रकरणी आरोपीसह त्याच्या प्रेयसीविरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास अक्कलकोट पोलीस करत आहेत.भीमाबाई हणमंत कळसगोंड (वय 48, रा सिनुर, ता. अक्कलकोट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुलगा रमेश हणमंत कळसगोंड आणि त्याची प्रेयसी गायत्री गुरप्पा जेवरगी दोघे (रा. सिनुर ता. अक्कलकोट) यांच्या विरोधात अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.संशयित आरोपी रमेश कळसकोंडा याचे गावातील एका महिलेसोबत प्रेमसंबंध सुरू होते.

याची कुणकुण भीमाबाई यांना लागल्यानंतर त्यांनी रमेशच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला. बाईचा नाद सोड असा तगादा लावला होता. संबंधित महिलेसोबत प्रेमसंबंध ठेवू नयेत, असा सल्ला आईनं दिलं. पण मुलगा काही केल्या ऐकायला तयार नव्हता.रमेश आणि भीमाबाई यांच्यात सासत्याने वाद होत होते. संशयित आरोपी रमेश याने आईची हत्या करण्याचा कट रचला. रमेशने आईचा खून करण्यासाठी गावातील प्रेयसीची मदत घेतली. तिच्याशी संगनमत करत आरोपी रमेश याने शेतात जन्मदात्या आईचा साडीने गळा आवळला. उतारवयात असलेल्या आईवर अशाप्रकारे मुलानेच हल्ला केल्याने ती स्वत:चा बचाव करू शकली नाही.

आरोपीनं साडीने गळा आवळल्याने गुदमरून तिचा जागीच मृत्यू झाला.मृत भीमाबाई यांचे पती हणमंत भागप्पा कळसगोंड (वय ५४) यांनी मुला विरोधात फिर्याद दिली. रमेश व गायत्री या दोघांचे प्रेम संबंध होते. भीमबाईचा विरोध होता. गुरुवारी साडेअकराच्या सुमारास संगप्पा गणपती उजनी यांच्या शेतात भीमबाई या हिचा रमेश आणि गायत्री या दोघांनी तिच्याच अंगावरील साडीच्या पदराने गळा आवळून खून केला. पोलिसांनी दोन्ही आरोपीना ताब्यात घेतले आहे. तपास एपीआय सुरवसे करत आहेत. घटनास्थळाला पोलीस निरीक्षक महेश स्वामी व एपीआय साईनाथ सुरवसे यांनी भेट दिली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.