धक्कादायक! सिमेंट ब्लॉक बनवणाऱ्या कंपनीमध्ये चक्क MD ड्रग्ज फॅक्टरी; 8 कोटींचा मुद्देमाल जप्त, साकीनाका पोलिसांची मोठी कारवाई .

मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटींचा MD ड्रग जप्त केलं आहे.मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी ड्रग्ज  विरोधात मोठी कारवाई करत तब्बल 8 कोटींचा MD ड्रग्ज जप्त केलं आहे. वसई कामन गाव परिसरात एमके ग्रीन सिमेंट ब्लॉक बनवणारी कंपनीमध्ये एमडी ड्रग्ज   बनवणारी फॅक्टरीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. वसईमध्ये सिमेंट बनवणारी कंपनीमध्ये एमडी ड्रग्ज बनवला जात असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई चा बडगा उगारत तीन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे मुंबईतील ड्रग्जचे आणखीन एक कनेक्शन उघड झाले असून सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.पुढे आलेल्या माहितीनुसार, या कारवाईमध्ये चार किलो एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. या चार किलो MD ड्रग्जचा बाजार भाव जवळपास 8 कोटी रुपये असल्याचं माहिती मिळत आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

तर अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सादिक शेख, सिराज पंजवाणी आणि सय्यद इराणी असे आहेत. हे सराईत आरोपी असून या आरोपीवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे. साकीनाका परिसरात MD ड्रग विकणारा एका आरोपीला साकीनाका पोलिसांनी अटक केली होती, या आरोपीकडून ही वसईची फॅक्टरी बद्दल माहिती मिळाली होती. यामध्ये मुख्य आरोपी फरार असून त्याच्या शोध साकीनाका पोलिसांकडून घेतला जात आहे.पीचें नावे निष्पन्न असताना पोलिसांनी आणखी तिघांना आरोपी केलंय. यामध्ये परांडा येथील मस्तान शेखसह साजिद मुजावर आणि शेळके नावाच्या व्यक्तीला आरोपी म्हणून सहभागी करण्यात आलंय. मात्र हे तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. 18 एप्रिल रोजी बार्शीत 20 ग्राम एमडी ड्रग्ससह पोलीसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा भांडफोड पोलिसांनी केलाय. 

आतापर्यंतची करवाई पाहता बार्शी ड्रग्ज तस्करीत एकूण 12 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील 9 आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा येथील तर तिघे बार्शी येथील आहेत. या 12 आरोपी पैकी 7 जण पोलिस कोठडीत असून तिघे फरार आहेत. परंडा येथील दीपक काळे आणि खांडवी येथील अय्याज शौकत शेख या 2 जणांना पोलिसांनी कालच अटक केली असून त्यांना आज 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर केले जाऊ शकते.परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर,हसन चाऊस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख आणि शेळके नावाच्या अश्या 9 जणांना आरोपी केली आहे त्यातील मुजावर, शेख व शेळके हे फरार आहेत. बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर अन्सार पटेल आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख हे 3 आरोपी बार्शी येथील आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर तस्करीचा भांडाफोड झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.