
जळगाव जिल्ह्यातील खाजगी व शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांची नियमित दप्तर तपासणी करण्याबाबत.. महोदय, नुकतीच नाशिक शहरातील एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तर तपासणी दरम्यान त्यांच्या बॅगेमध्ये चाकू, कट्यार व इतर आक्षेपार्ह वस्तू आढळून आल्या. ही घटना अत्यंत गंभीर व चिंतेची असून, शिक्षण संस्थांतील शिस्त, सुरक्षितता व विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. सध्याच्या बदलत्या सामाजिक परिस्थितीत शाळेमधील विद्यार्थ्यांकडून अशा धोकादायक वस्तू शाळेत आणल्या जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. यावर वेळेत नियंत्रण मिळवणे आणि शाळेतील वातावरण सुरक्षित ठेवणे ही शिक्षण प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे.त्या पार्श्वभूमीवर खालील मागण्या सादर करीत आहोतः
१. जळगाव जिल्ह्यातील सर्व खाजगी व शासकीय शाळांमध्ये दर आठवड्याला किंवा ठराविक कालावधीत विद्यार्थ्यांच्या दप्तरांची तपासणी करण्याचे आदेश द्यावेत. २. या तपासणीत आक्षेपार्ह वस्तू, धोकादायक साहित्य, व्यसनकारक पदार्थ यावर लक्ष ठेवण्यात यावे. 3. शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक यांना यासंदर्भात विशेष सूचना व प्रशिक्षण देण्यात यावे. ४. पालकांना देखील या संदर्भात जागरूक करून, त्यांच्या सहकार्याची मागणी करण्यात यावी.
सदर उपाययोजना राबवल्यास विद्यार्थ्यांचे सुरक्षित व सकारात्मक शैक्षणिक वातावरण टिकवून ठेवता येईल. आपण या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.मनसे जिल्हाध्यक्ष अॅड. जमील देशपांडे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील शहर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील ललित शर्मा महेंद्र सपकाळे संदीप मांडोळे इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते