कुटुंबाला थारने उडवलं, पप्पासह ३ वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू, ८ महिन्यांचं बाळ… जळगाव हळहळलं.

जळगावात एका भीषण अपघातात पिता-पुत्रांचा अंत झाला आहे. बाईक आणि थारच्या धडकेत या पिता-पुत्राचा मृत्यू झाला आहे, तर पत्नी आणि ८ महिन्यांचं बाळ जखमी झाल्याची माहिती आहे.जळगावातील रावेर येथे झालेल्या भीषण अपघातात पिता-पुत्राचा हृदयद्रावक असा अंत झाला आहे. मोटारसायकल आणि थार जीपच्या धडकेत या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने रावेरमध्ये प्रत्येकजण हळहळला आहे. कारण, यातील मुलगा हा फक्त तीन वर्षांचा चिमुरडा होता, जो आपल्या वडिलांसोबत गाडीवरुन जात होता.रावेर तालुक्यातील बोर घाटात सोमवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. थार जीप आणि मोटरसायकल यांच्यात हा भीषण अपघात झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मोटरसायकलस्वार पिंटू बोडोले (वय ३०) आणि त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रितीक बोडोले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली आहे.

याप्रकणी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पिंटू बोडोले हे पत्नी मालुबाई (वय २८) आणि दोन मुले रितीक (वय ३) व टेंगुराम (वय ८ महिने) यांच्यासोबत भुसावळहून पालकडे नातेवाइकांच्या भेटीसाठी निघाले होते. दरम्यान, खेरगावकडून भुसावळकडे भरधाव वेगाने येणाऱ्या थार गाडीने त्यांच्या मोटरसायकलला जबर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की यात पिंटू व त्यांचा चिमुकला मुलगा रितीक यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर, त्यांच्या पत्नी आणि ८ महिन्यांचं बाळ जखमी झालं आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.बोडोले कुटुंब हे भुसावळ येथे मिस्त्री काम करून उदरनिर्वाह करीत होते.

अत्यंत गरिबीच्या परिस्थितीत जगणाऱ्या या आदिवासी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजपा पक्षाचे पूर्व तालुकाध्यक्ष रविंद्र पाटील व बाळा आमोदकर यांनी रावेर ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी जखमी मालुबाई बोडोले व टेंगुराम बोडोले यांना तातडीने फैजपूर येथे पुढील उपचारासाठी हलविले, तसेच कुटुंबीयांचे सांत्वन केले. या अपघातामुळे संपूर्ण रावेर तालुक्यात शोककळा पसरली असून संबंधित वाहनचालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. पोलीस सध्या प्रकरणाचा तपास करत आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.