
मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील सुनीता बोंढारे या ४५ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात असताना घरातील गॅस सिलेंडरची गळती होऊन अचानक आगीचा भडका उडाला. यात आजी व नातू आगीच्या विळख्यात सापडल्याने दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. घरात आरडाओरड सुरू झाल्याने शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांच्याही अंगावर पाणी टाकून आग विझवली.वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील एका घरातील गॅस सिलिंडर ची गळती होऊन घराला आग लागल्याने ८ वर्षीय चिमुकल्या नातवाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून आजी गंभीर जखमी झाल्याची घटना रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे.
मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील सुनीता बोंढारे या ४५ वर्षीय महिला आपल्या आठ वर्षीय नातू चरण बोंढारेसह रात्री घरात असताना घरातील गॅस सिलेंडरची गळती होऊन अचानक आगीचा भडका उडाला. यात आजी व नातू आगीच्या विळख्यात सापडल्याने दोघेही भाजून गंभीर जखमी झाले. घरात आरडाओरड सुरू झाल्याने शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेत दोघांच्याही अंगावर पाणी टाकून आग विझवली.
दोघांनाही उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले असता यामध्ये आठ वर्षीय चिमुकला चरण बोंढारेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर आजीची प्रकृती गंभीर असल्यानं तिला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच मालेगाव पोलिस व अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाल होते. मोठ्या प्रमाणात आग लागल्याने तब्बल दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. या आगीमध्ये घरगुती साहित्यसह अन्नधान्य जळून खाक झाले असून आठ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.दुसरीकडे, पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी व सासूला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील नाशिकमधील सोनारी येथे रविवारी (दि.६) मध्यरात्रीच्या सुमारास घडला.
केदारनाथ दशरथ हांडोरे (वय २४, रा. शिंदेवाडी ता. सिन्नर) असे मृत पतीचे नाव आहे. केदारनाथ व स्नेहल सोमनाथ शिंदे (वय १९) यांचा गेल्यावर्षी प्रेमविवाह झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी स्नेहल व केदारनाथ यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे स्नेहल माहेरी सोनारीला आली होती. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास केदारनाथ त्याच्या मित्रांसोबत सोनारी येथे आला. स्नेहल व तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथने वाद घालत चाकूचा धाक दाखवून स्नेहलला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्याने संतप्त केदारनाथने स्वत:ला ज्वलनशील पदार्थाच्या साह्याने पेटवून घेत पेटलेल्या अवस्थेतच स्नेहल व सासू अनिता सोमनाथ शिंदे यांना मिठी मारली. यात स्नेहल व अनिता शिंदे याही गंभीररित्या भाजल्या गेल्या.
Video Player
00:00
00:00