
वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून कारने आपल्या कुटुंबासह वर्ध्याच्या दिशेने येत येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला अपघात झालाकारची टँकरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील चौघा जणांना प्राण गमवावे लागले. पोलीस कर्मचाऱ्याचे संपूर्ण कुटुंब या अपघातात मृत्युमुखी पडले. वर्ध्याच्या तरोडा नजीक हा अपघात झाला. पती पत्नी आणि दोन मुलं असे चौघे जण अपघातात ठार झाले. पोलीस कुटुंब मांडगाव येथून वर्ध्याकडे येत असताना कारची टँकरला धडक बसली.वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील मांडगाव येथून कारने आपल्या कुटुंबासह वर्ध्याच्या दिशेने येत येत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या गाडीला अपघात झाला आहे. रस्त्यावर रान डुक्कर आडवे आल्याने तरोडा गावाजवळ कार अनियंत्रित झाली. त्यामुळे समोरून येणाऱ्या डिझेल टँकरला या गाडीची टक्कर झाली आहे.यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
तर प्रशांत वैद्य व मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. तीन वर्षांचा मुलगा तर पाच वर्षांच्या मुलीचा मृतकांमध्ये समावेश आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.दुसरीकडे, ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावर दोन दिवसांत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघांना प्राण गमवावे लागले आहेत. मागील काही वर्षांत वाढत्या अपघातांमुळे घोडबंदर रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे.मिरा रोड येथील दीपक दुखंडे हे त्यांच्या बहिणीच्या नवीन घरात आयोजित पूजेसाठी पत्नी विद्या (४८) हिच्यासह दुचाकीवरून रविवारी ठाण्यात आले होते. सायंकाळी दुखंडे दाम्पत्य पुन्हा दुचाकीवरून घरी जाण्यास निघाले. घोडबंदर रस्त्याने जात असताना, ओवळा सिग्नलजवळ एका ट्रकने पाठीमागून त्यांच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे दुखंडे दाम्पत्य दुचाकीवरून खाली पडले.गंभीर जखमी झालेल्या विद्या यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्यांना सिव्हिल रुग्णालयात हलवले. त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून, त्यांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ट्रकचालकाविरुद्ध कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस चालकाचा शोध घेत आहेत.दुसऱ्या घटनेत, सोमवारी दुपारी सुधीर चौधरी (५४) हे दुचाकीवरून जात होते. घोडबंदरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर ओवळा नाका येथे दुपारी दीड वाजता त्यांचा अपघात झाला आणि ते ट्रकच्या मागील चाकाखाली आले. ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने सुधीर यांचा जागीच मृत्यू झाला, अशी माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. चौधरी हे ठाण्यातील उथळसर येथे राहत होते.
Video Player
00:00
00:00