
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत.कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक बडे नेते एकनाथ शिंदेंची शिवसेना किंवा भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यानंतर आता ठाकरे गटात कोकणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण २०१९ मध्ये गुहागर विधानसभा निवडणूक लढवलेल्या सहदेव बेटकर यांनी ठाकरे गटात घरवापसी केली आहे. ते ठाकरेंच्या साथीला येत असल्याने पक्षाला नवसंजीवनी मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे. सहदेव बेटकर यांचा आज मुंबईत उद्धवठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी प्रवेश होणार आहे. शिवसेना सोडून ते काही काळापूर्वी काँग्रेसमध्ये गेले होते. मात्र आता त्यांनी पुन्हा ठाकरेंचा झेंडा हाती धरला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत. ८ एप्रिल २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांच्या समवेत त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटात जाहीर पक्षप्रवेश केला आहे.बेटकर यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५२ हजार मते मिळवली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने सहदेव बेटकरांचा येथील गावांशी, वाड्यांशी, कार्यकर्त्यांशी चांगला संपर्क होता. २०१९ च्या निवडणुकीत ते काँग्रेसचे उमेदवार होते. निवडणुकीपूर्वी जिल्हा परिषद सदस्य, सभापती म्हणून ते सक्रीय होते. पण पराभूत झाल्यानंतर सहदेव बेटकर सक्रीय नव्हते.२०१४ व २०१९ ची विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती.