मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याचा अंदाज.

तनिषा भिसे यांचा मृत्यू करण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाला नसल्याने एका व्यक्तीनं जीव गमावला आहे.दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला हे प्रकरण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे चंद्रकांत धोत्रे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना हृदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. मात्र वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.मंत्रालयाच्या जवळ आकाशवाणी येथील आमदार निवासातील रुम नं ४०८ ही आमदार विजय देशमुख यांची खोली होती.

तेथे मुंबईत कामानिमित्त आलेले चंद्रकांत धोत्रे वास्तव्यास होते. रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करण्यात आला मात्र कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर पोलिसांना फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून जीटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार निवासातील फोन गेल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर सर्वसामान्यांच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांनी यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल केली नाही.

त्यामुळे पोलिसांनी या घटनेसंबंधी कोणतीही कारवाई केली नाही. धोत्रे यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी रवाना झाले आहेत.चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजयराव देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. चंद्रकांत धोत्रे हे बैठकीनिमित्त मुंबईत आले होते. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यावेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणाने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला आहे. तसेच त्या रुग्णालयात आयसीयू नसल्याने दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत होते मात्र त्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.