विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सुरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. ” तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे” असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललं.कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. सुरज अनंत पवार (वय ३१ वर्षे, रा. मळगाव-कुंभार्लीवाडी, ता. सावंतवाडी, सध्या रा. रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्स, केळबाईवाडी, कुडाळ) असे मयत पोलिसाचे नाव आहे. त्यांचा मृतदेह राहत्या घरातील फ्लॅटमध्ये सिलिंग फॅनला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
तपासाअंती सूरज यांनी आत्महत्या केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी सुरजने आपल्या मित्राच्या मोबाईलवर एक मेसेज केला होता. ” तुला कुडाळला यावंच लागेल, मी जीवन संपवत आहे” असा संदेश पाठवून त्याने टोकाचं पाऊल उचललं. त्यामुळे सुरजच्या आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. सोमवारी दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले.कुडाळ पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार सुरज अनंत पवार हे कुडाळ पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते. चार महिन्यांपूर्वी आवळेगाव आऊटपोस्ट येथून ते कुडाळ पोलीस ठाण्यात हजर झाले होते. ते कुडाळमधील रामेश्वर प्रसाद कॉम्प्लेक्समध्ये एकटेच राहत होते.सोमवारी दुपारी त्यांनी आपल्या मित्राच्या मोबाईलवर ‘तुला कुडाळला यावेच लागेल, मी जीवन संपवीत आहे’ अशा आशयाचा मेसेज टाकला.









