लोणी खु ता.पारोळा येथे श्री विठ्ठल मंदीर जिर्णोध्दारासह विविध विकासकामांचा भुमीपुजन सोहळा अमोल चिमणराव पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.
पारोळा प्रतिनिधी ; वाल्मीक पाटील. पारोळा – तालुक्यातील लोणी खु येथे आमदार चिमणरावजी पाटील यांच्या अथक प्रयत्नांतुन व जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांच्या संकल्पनेतुन मुलभुत सुविधेसह विविध कामांना मंजुर मिळाली आहे. या विकासकामांचे आज अमोल पाटील यांच्या शुभहस्ते भुमीपुजन करण्यात आले. तसेच गावातील भाविकांचे मोठे श्रध्दास्थान असलेल्या श्री विठ्ठल मंदीर जिर्णोध्दार सोहळा मोठ्या उत्साहात व अमोल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.










