चोपडा शहरातील विविध समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर
साने गुरुजी नगर परिसरातील अतिक्रमणाच्या कार्यवाहीला वेग द्या – रहिवास्यांची मागणी जिल्हा प्रतिनिधी समाधान कोळी चोपडा दि. 22 ऑगस्ट 2024 चोपडा शहरातील साने गुरुजी नगर परिसरातील ओपन स्पेस मध्ये झालेल्या अतिक्रमणावर कारवाई होणे संदर्भात स्थानिक रहिवास्यांनी 19 जानेवारी 2024 रोजी नगरपालिकेकडे तक्रार अर्ज दाखल केलेला होता तरी सदर अर्ज करून सात महिने उलटून व वारंवार पाठपुरावा करून सुद्धा सदर समस्येबाबत नगरपालिकेकडून हळुवार कार्यवाही होत असल्यामुळे नागरिकांनी त्रस्त होऊन नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना गाठले. पण मुख्याधिकारी प्रशिक्षणाकरिता चाळीसगाव येथे गेले असल्यामुळे नगररचना अधिकारी श्री चेतन अहिरराव यांची भेट घेण्यात आली.










