चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात तरुणाने चाकूने त्याचा गळा चिरला. पुणे जिल्ह्यातील नर्हे परिसरात हा खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेश पवार (रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अर्जुन राय रियांग गंभीर जखमी झाला. सचिन मधुकर खांबल (वय ४०, रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे.










