शिवीगाळ केल्याचा राग, पुण्यात रुममेटवर जीवघेणा हल्ला, अर्जुनच्या अंगावर महेश धावून गेला अन्…

चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. शिवीगाळ केल्याच्या रागातून रूममेटच्या अंगावर धावून जात तरुणाने चाकूने त्याचा गळा चिरला. पुणे जिल्ह्यातील नर्‍हे परिसरात हा खुनी हल्ला करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महेश पवार (रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, अभिनव कॉलेज) याच्यावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्यात अर्जुन राय रियांग गंभीर जखमी झाला. सचिन मधुकर खांबल (वय ४०, रा. झोलो पिनॅकल, वाल्हेकर चौक, नऱ्हे) यांनी फिर्याद दिली आहे.

दाखल गुन्ह्यानुसार, ऑक्टोबर २०२४ पासून महेश पवार आणि अर्जुन राय रियांग यांच्यासोबत फिर्यादी सचिन राहतात. अर्जुन आणि सचिन होस्टेलमध्ये हाउसकीपिंगचे काम करतात. महेश पवार त्याच ठिकाणी सुरक्षारक्षकाचे काम करतो. महेश आणि अर्जुन यांचे वारंवार वाद होत असत. अर्जुन महेशला शिवीगाळ करीत असल्याने महेशचा अर्जुनवर राग होता.चार एप्रिल रोजी रात्री पावणे अकरा वाजताच्या सुमारास सचिन रूममध्ये असताना शिवीगाळीच्या कारणावरून अर्जुन आणि महेश यांच्यात पुन्हा वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर महेशने किचनमधील चाकू आणून अर्जुनवर वार केले. त्यानंतर अर्जुन खाली पडला.महेशला बाजूला ढकलून देत सचिनने बाजूच्या मित्रांना ओरडून बोलावले. तोपर्यंत महेश तेथून पळून गेला. सचिन यांनी अर्जुनला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.दुसरीकडे, मुंबईत शनिवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. कांदिवली येथे टेम्पोने दिलेल्या धडकेत वृद्ध महिला ठार झाली, तर साकीनाका येथे भरधाव कारच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. विक्रोळी येथे विचित्र अपघातात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांपैकी एक जण खाली पडून मृत्युमुखी पडला.कांदिवलीच्या डहाणूकरवाडी राहणाऱ्या हंसा धिवाला आणि भारती शहा या वृद्ध महिला सायंकाळी पश्चिमेकडील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या इमारतीसमोर सिग्नल लागण्याची वाट पाहत उभ्या होत्या. सिग्नल लागल्यानंतर रस्ता ओलांडत असताना भरधाव टेम्पोने त्यांना धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या दोघींना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी भारती यांना मृत घोषित केले. त्यानंतर हंसा यांच्या तक्रारीवरून कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चालक इक्बाल शेखला अटक केली.

  • Related Posts

    उद्या पुन्हा मोठी कारवाई होणार? पाकला लागून असलेल्या राज्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय.

    पाकिस्तानला लागून असलेल्या ४ राज्यांमध्ये उद्या मॉक ड्रिल घेण्यात येणार आहे. तसे आदेश या राज्यांना देण्यात आलेले आहेत. त्यामुळे सीमावर्ती भागांमध्ये उद्या हालचालींना वेग आलेला असेल.नवी दिल्ली: भारत-पाकिस्तान सीमेवरील ४…

    महाबळेश्वरचा प्लॅन, एसीवरून वाद, गाडीत दोघांची डोकी तापली अन् भलतंच घडलं.

    नवी मुंबईमधून एक धक्कदायक बातमी समोर आली आहे. पती-पत्नीची भांडणे अनेकदा पाहिली ऐकली असतील पण इतकं टोकाचं भांडण पहिल्यांदाच झालेलं असावं. कारणसुद्धा अगदी शुल्लक होतं.मुंबई उपनगरातील दाम्पत्य हे शुक्रवार,शनिवार आणि…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    उद्या पुन्हा मोठी कारवाई होणार? पाकला लागून असलेल्या राज्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय.

    उद्या पुन्हा मोठी कारवाई होणार? पाकला लागून असलेल्या राज्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय.

    महाबळेश्वरचा प्लॅन, एसीवरून वाद, गाडीत दोघांची डोकी तापली अन् भलतंच घडलं.

    महाबळेश्वरचा प्लॅन, एसीवरून वाद, गाडीत दोघांची डोकी तापली अन् भलतंच घडलं.

    भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर संपत्ती आणि मानसिक छळासंदर्भातील गंभीर आरोप; पोलिसांवर दुर्लक्षाचा ठपका.

    भाजप आमदार परिणय फुके यांच्यावर संपत्ती आणि मानसिक छळासंदर्भातील गंभीर आरोप; पोलिसांवर दुर्लक्षाचा ठपका.

    फोन कॉल अन् बॉलीवूड ​स्टार कायद्याच्या कचाट्यात; मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय?

    फोन कॉल अन् बॉलीवूड ​स्टार कायद्याच्या कचाट्यात; मिठी नदी घोटाळ्यात दिनो मोरियाचं कनेक्शन काय?