ठाकरे शिवसेना सोडणार हीच अफवा बाकी, खासदार संजय राऊत यांचा टोला.

 शिवसेनेबाबत अनेक अफवा उठवल्या जात आहेत, हा इकडे चालला, तो तिकडे चालला… आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही चालले हीच अफवा बाकी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी टोला लगावला आहे.‘हा इकडे चालला, तो तिकडे चालला, अशा अफवा तीन-चार महिन्यांपासून शिवसेनेच्या बाबतीत उठविल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतही चाललेत एवढीच अफवा उठविणे तेवढे बाकी आहे. परंतु अशा कितीही अफवा उठल्या तरी नाशिकमधील शिवसैनिक जागेवरच आहेत. सर्वांनी १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मेळाव्यातून आपली ताकद दाखवून द्या,’ असे आवाहन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी केले.गोविंदनगर येथील मनोहर गार्डन येथे १६ एप्रिलला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

या पार्श्वभूमीवर राऊत यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जिल्ह्यातील जागा महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकतील असा जनतेचा कौल होता. सुधाकर बडगुजर व वसंत गिते यांचे काम चांगले होते. परंतु विजय मिळू शकला नाही. आता सावध होऊन पुन्हा उभारी घ्यावी लागेल.’ ‘अलीकडेच मनसैनिकांनी वॉचमनला मारले. राज ठाकरे जे आंदोलन करीत आहेत ते बाळासाहेबांनी सुरू केले. त्यावेळी आम्ही वॉचमनला नाही, तर चेअरमनला मारले होते. त्यामुळेच आज एअर इंडियात ‘जय महाराष्ट्र’चा नाद घुमतो आहे,’ असे राऊत म्हणाले. ‘कधी कोण आयाराम व गयाराम होईल याचा काही नेम नाही. नाशिक कायम शिवसेनेचेच,’ राहील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.दरम्यान, सरकारमध्ये वक्फ विधेयक मंजुर करण्यात आलं आहे. या विधेयकावर राज्यभरासह देशात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. वक्फ विधेयकावरुन उद्धव ठाकरे यांनीही सरकारला टोला लगावला आहे. ‘वक्फ संशोधन विधेयकाविरोधात काँग्रेसला न्यायालयात जायचे असेल, तर जाऊ द्या. आम्ही आमची भूमिका मांडली आहे. यापुढे वेळ येईल, तेव्हा बोलता येईल,’ अशी भूमिका मांडत शिवसेना उबाठा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयकाविरोधात न्यायालयात जाणार नसल्याचे स्पष्ट केले.‘भाजपला खिश्चन समाजाकडे असलेल्या जमिनी घ्यायच्या असून, नंतर हिंदू देवस्थानांच्या जमिनीवरही त्यांचा डोळा आहे,’ असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत संमत झाले. या विधेयकास शिवसेना उबाठा पक्षाने विरोध केला होता. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे यांनी भूमिका मांडली.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.