कलिंगड विक्रेत्याच्या मोबाईलमध्ये आढळले नवजात बालकांचे फोटो आणि त्यांच्या किंमती, मोठ्या रॅकेटचा संशय, Badlapur मध्ये खळबळ.

 अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. या भागात फळविक्रीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून वन विभागाच्या हद्दीत कचरा टाकला जात होता. याबाबत वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित कलिंगड विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र कचरा टाकणाऱ्या व्यक्तीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत त्याचे चित्रफीत काढत ती व्हायरल केली होती.नवजात बालकांच्या(Newborn Babies) खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रबदलापुरातकरणात बदलापूर पोलिसांनी एका २४ वर्षीय कलिंगड विक्रेत्या व्यक्तीला अटक केली आहे. वन विभागाच्या जागेत कचरा टाकण्यावरून कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून हे रॅकेट उघड झाले आहे.अंबरनाथ येथील फॉरेस्ट(Forest) नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. या भागात फळविक्रीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून वन विभागाच्या हद्दीत कचरा टाकला जात होता. याबाबत वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित कलिंगड विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र कचरा टाकणाऱ्या व्यक्तीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत त्याचे चित्रफीत काढत ती व्हायरल केली होती. मात्र याच व्यक्तीने व्हायरल केलेल्या एका चित्रफितीच्या प्रसाराबाबत माहिती घेण्यासाठी विक्रेत्याचा मोबाइल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासला असता, त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवजात बालकांचे फोटो आणि त्यांच्यासोबत काही किंमती लिहिलेल्या पोलिसांना आढळल्या.यासोबतच किंमतींबाबत झालेली संभाषणेही समोर आली. हे सर्व संशयास्पद वाटल्याने वन अधिकारी वाळिंबे यांनी तात्काळ बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार नोंदवली. यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी वलीवली येथे राहणारा तुषार साळवे ( २४) या आरोपीला अटक केली. आरोपीच्या मोबाइलमध्ये बालकांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित संदेश आढळले असून, प्रत्यक्ष व्यवहार पकडला गेला नसला तरी या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहे. तर आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.दुसरीकडे, घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. या प्रकरणी एका सुरक्षारक्षकाला समतानगर पोलिसांनी अटक केली. कांदिवली परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत होती. एकटीला पाहून सुरक्षारक्षक तिच्याजवळ आला आणि अश्लील चाळेकरू लागला. तिने विरोध करताच सुरक्षारक्षकाने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी पोक्सो तसेच इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक केली.

  • Related Posts

    शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार .

    जळगाव – येथील पंचायत समिती शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी तथा ग स सोसायटी संचालक विजय शांतीलाल पवार यांचा तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत टोबॅको फ्री इंडिया राष्ट्रीय स्तरावरील अवार्ड मिळाल्या…

    जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल.

    जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची डंपरद्वारे हत्या करण्यात येईल, असा धमकीचा ईमेल मुख्यमंत्री कार्यालयाला प्राप्त झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद (Jalgaon District Collector Ayush Prasad) यांची डंपरद्वारे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार .

    शिक्षण विस्तार अधिकारी विजय पवार यांचा सत्कार .

    जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल.

    जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी, मुख्यमंत्री कार्यालयाला आला खळबळजनक ईमेल.

    महाराजांचा अपमान आता बस्सsss! रायगडावर फडणवीसांसमोरच उदयनराजेंच्या शाहांकडे पाच प्रमुख मागण्या, अरबी समुद्र, सेन्सर बोर्ड अन्…

    महाराजांचा अपमान आता बस्सsss! रायगडावर फडणवीसांसमोरच उदयनराजेंच्या शाहांकडे पाच प्रमुख मागण्या, अरबी समुद्र, सेन्सर बोर्ड अन्…

    निलेश घायवळ याला कानफटवणाऱ्याची ओळख पटली, कुस्तीच्या आखाड्यात घुसून मारणारा ‘तो’ नेमका कोण?

    निलेश घायवळ याला कानफटवणाऱ्याची ओळख पटली, कुस्तीच्या आखाड्यात घुसून मारणारा ‘तो’ नेमका कोण?