व्हिडिओ कॉल करुन पत्नीचा गळफास, पतीनंही जीव दिला; लग्नानंतर ४० दिवसांनी जोडप्यानं जीवन संपवलं.

किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले.किरकोळ वादातून नवविवाहित दाम्पत्यानं आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील केतुरा येथे घडली. अक्षय गालफाडे (२७) आणि पत्नी शुभांगी (२१) अशी मृतांची नावं आहेत. दोघांच्या पार्थिाववर गुरुवारी अंत्यविधी करण्यात आले. नवदाम्पत्याच्या निधनानं कुटुंबियांना धक्का बसला असून गावावर शोककळा पसरली आहे.केतुरा येथील अक्षय गालफाडेचा विवाह जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यामधील शुभांगीसोबत ४० दिवसांपूर्वी झाला. लग्नासाठी काढलेली सुट्टी संपल्यावर अक्षय पुण्याला निघून गेला. तिथे तो लाईट फिटिंगचं काम करायचा. नुकताच तो गावाकडे आला होता. बुधवारी म्हणजेच २ एप्रिलला तो पुन्हा पुण्याला जाण्यास निघाला.

मलाही सोबत न्या, असा हट्ट शुभांगीनं पुण्याला निघालेल्या अक्षयकडे धरला. त्यावर पुण्यात भाड्यानं खोली घेतो आणि मग तुला सोबत नेतो, अशा शब्दांत अक्षयनं शुभांगीची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण शुभांगी ऐकायला तयार नव्हती. सोबत नेलं नाही, तर जीव देईन, अशी थेट धमकी देत तिनं दिली. शुभांगी टोकाचं पाऊल उचलणार नाही, असं अक्षयला वाटत होतं. त्यामुळे शुभांगीला मागे सोडून तो पुण्याला जाण्यासाठी घरातून निघाला.अक्षय बसमधून पुण्याला जाण्यास निघालेला असताना शुभांगीनं त्याला व्हिडीओ कॉल केला. त्यावेळी अक्षय नवगण राजुरीजवळ पोहोचला होता. शुभांगीनं अक्षयला व्हिडीओ कॉल करुन गळफास लावून घेतला. यानंतर अक्षय तातडीनं माघारी फिरला. शुभांगीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात सुरु असताना दोन्ही बाजूंच्या नातेवाईकांमध्ये वाद झाले. शुभांगीच्या कुटुंबियांनी आक्रमक पवित्रा घेतला.शुभांगीनं केलेली आत्महत्या, त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी घेतलेली आक्रमक भूमिका यामुळे तणावाखाली आलेल्या अक्षयनं शेतात जाऊन गळफास घेतला. या प्रकरणाची नोंद बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. गुरुवारी दुपारी अक्षय आणि शुभांगी यांच्या पार्थिवावर केतुरा गावात अंत्यविधी करण्यात आले. एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार पार पडले. अक्षयच्या कुटुंबियांनी त्याच्या मृत्यूपश्चात नेत्रदान केलं. नवदाम्पत्यानं केलेल्या आत्महत्येनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • Related Posts

    श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा.

    पालकमंत्री यांनी दिलेला शब्द पाडला अशा पद्धतीने लोक अर्पण सोडा कालच्या तारखेला करण्यात येणार आहे त्या लोक अर्पण सोहळा चे उद्घाटन गुलाबराव पाटील यांच्या हस्ते होणार असून सर्व. सर्व भाविकांना…

    पाकिस्ताननंतर बांगलादेशमध्ये लुटमार झाली सुरू, लोकांनी बाटा आणि KFC दुकानं लुटली, खुर्च्या टेबल सुद्धा नेले पळवून.

    बांगलादेशमधील लोकांनी बाटा शोरूमध्ये घुसून पूर्ण दुकान लुटलं, अगदी टेबल, खुर्च्या, लाईट्स, एवढंच काय तर दुकानाच्या पाटीमधील बल्ब सुद्धा सोडले नाहीत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा लोकांना कुठली शिक्षा…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा.

    श्री प्राचीन कालीन मारोती मंदिर प्राण प्रतिष्ठा व जीर्णोद्धार सोहळा.

    पाकिस्ताननंतर बांगलादेशमध्ये लुटमार झाली सुरू, लोकांनी बाटा आणि KFC दुकानं लुटली, खुर्च्या टेबल सुद्धा नेले पळवून.

    पाकिस्ताननंतर बांगलादेशमध्ये लुटमार झाली सुरू, लोकांनी बाटा आणि KFC दुकानं लुटली, खुर्च्या टेबल सुद्धा नेले पळवून.

    ‘जेल माझं घर’; ‘फिल्मी डायलॉग’ मारत बिल्डरकडे मागितली खंडणी, पोलिसांनी नांग्या ठेचल्या.

    ‘जेल माझं घर’; ‘फिल्मी डायलॉग’ मारत बिल्डरकडे मागितली खंडणी, पोलिसांनी नांग्या ठेचल्या.

    सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, प्रकाश आंबेडकरांची पोस्ट, आजच्या सुनावणीत काय झालं?

    सोमनाथ सुर्यवंशी प्रकरणात हायकोर्टाची राज्यसरकारला नोटीस, प्रकाश आंबेडकरांची पोस्ट, आजच्या सुनावणीत काय झालं?