“मी जातोय… मम्मी पप्पा तुम्ही रडू नका”, पत्नी आणि सासरच्यांचा जाच, वैतागलेल्या तरुणाचं टोकाचं पाऊल, अखेर…

उत्तर प्रदेशातील इटावाच्या चौबिया पोलीस स्टेशन परिसरातील उन्वा संतोषपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. २३ वर्षीय अमितने रहात्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलितील पंख्याच्या हुकला लटकून आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांना खोलीतून पाच पानांची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे.एका २३ वर्षीय तरुणाने रहात्या घरी पंख्याच्या हुकला स्वतःला लटकवत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्याच्या खिशातून पाच पानांची सुसाईड नोट सापडली आहे. ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील(UttarPradesh) इटावाच्या चौबिया पोलीस स्टेशन परिसरातील उन्वा संतोषपूर गावात ही दुर्दैवी घटना घडली आहे. २३ वर्षीय अमितने रहात्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलितील पंख्याच्या हुकला लटकून आत्महत्या केली. घटनेनंतर पोलिसांना खोलीतून पाच पानांची सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्याने आपल्या मृत्यूसाठी पत्नी आणि सासरच्या लोकांना जबाबदार धरले आहे.

कुटुंबातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार, अमितचे लग्न दीड वर्षांपूर्वी रिंकी नावाच्या मुलीशी झाले होते आणि दोघांनाही चार महिन्यांचा मुलगा आहे. तथापि, लग्नापासून पती-पत्नीमधील संबंध ताणले गेले होते आणि दोघांमध्ये वारंवार वाद होत होते.काही दिवसांपूर्वी अमितची पत्नी तिच्या आईवडिलांच्या घरी रहायला गेली होती. घटनेच्या दिवशी अमितचे वडील एका निमंत्रणासाठी बाहेर गेले होते आणि त्याची आई त्यावेळी घराबाहेर काम करत होती. अमित बराच वेळ खोलीतून बाहेर न आल्याने त्याच्या आईने त्याला आवाज दिला. परंतु अमितचा काहीही प्रतिसाद न आल्याने त्याची आई वरच्या मजल्यावर गेली. आणि समोरचे दृष्य पाहून तिला धक्का बसला. तीने आरडाओरडा केल्याने शेजारी घटनास्थळी जमा झाले. जमावाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी अमितचा मृतदेह ताब्यात घेतला.गुरुवारी(३ एप्रिल) अमितच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांना मृताच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की माझ्या मृत्यूसाठी माझी पत्नी, सासू, मेहुणी आणि मेहुणे जबाबदार आहेत. सर्व पुरावे माझ्या फोनमध्ये आहेत, पासवर्ड ७८९६ आहे. आई आणि बाबा, रडू नका, माझ्या आत्म्याला शांती मिळणार नाही.एसएचओ विपिन कुमार मलिक म्हणाले की, प्राथमिक तपासात आत्महत्येचे कारण पती-पत्नीमधील वाद असल्याचे दिसून येत आहे. तथापि, सुसाईड नोटची सखोल चौकशी केली जात आहे आणि मोबाईल फोन देखील फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला जाईल.

  • Related Posts

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात धक्कादायक घटना घडली. रागाच्या भरात वादानंतर तरुण तरुणीनी डिंभे धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्यात उड्या घेतल्या, स्मार्तपणे बेपत्ता झाले. येथील शोधकार्य सुरु असून पाण्याचा वेग कमी केल्यानंतर…

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्रभर अंधारात दोघांची वाट बघत चिमुरडी एकटीच बसली, ते परतलेच नाहीत, सकाळ होताच सर्वांना बसला धक्का.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    सप्तशृंगी मातेच्या गडावर पायी जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी मोफत औषधी वाटप.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.

    ‘कुठल्याही मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळू नये’, चंद्रशेखर बावनकुळे यांचा सल्ला.