सप्तश्रुंगी माता गडावर पायी जाणाऱ्या भाविकासाठी आज दिनांक 5 एप्रिल पासून, पारोळा आई हॉस्पिटल, प्रसूतीगृह वा सोनोग्राफी सेंटर तसेच आई फाउंडेशन तर्फे मोफत औषधी वाटपास सुरुवात करण्यात आली.

प्रसंगी आई हॉस्पिटल चे संचालक डॉ. वैशाली नेरकर यांच्या हस्ते श्री गणेश पुजनाने औषधी वाटप सुरु करण्यात आले. प्रसंगी आई फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील, हर्षल चौधरी, राहुल पाटील, तसेच अशोक भाऊ मिस्तरी वा भैयाभाऊ मिस्तरी यांनी उपस्थिती दर्शवली. भाविकांसाठी उपक्रम तीन दिवस राबविण्यात येणार आहे तरी सर्व भाविकांनी अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.









