रात्री जेवून खोलीत गेले आणि अचानक भयंकर आवाज…महानगरपालिकेच्या आयुक्तांचा आयुष्य संपवण्याचा प्रयत्न.

लातूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी केला आत्महत्येचा प्रयत्न केला. स्वतःवर गोळी झाडून घेतली. सुदैवाने यात ते बचावले असन लातूरच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी शासकीय घरामध्ये स्वतःवर गोळी झाडत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. लातूर शहर रात्री उशिरा झालेल्या घटनेमुळे हादरुन गेले आहे. लातूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. स्वतःच्या घरात त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.गोळीचा आवाज झाल्याने घरातील इतर सदस्यांनी त्यांच्या रूमकडे धाव घेतली. तात्काळ त्यांना लातूर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांच्यावर उपचार सुरू झाले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. डोक्याच्या उजव्या बाजूने गोळी आरपार गेली आहे. रात्रीतून काही शस्त्रक्रिया पार पडल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचाराला ते प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर हनुमंत किनीकर यांनी दिली आहे.

आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्येचा प्रयत्न का केला? याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. नेहमीप्रमाणे घरच्यांशी बोलत त्यांनी जेवण केलं. जेवण झाल्यावर ते स्वतःच्या रूमकडे गेले. काही वेळात गोळी झाडल्याचा आवाज आला. आत्महत्येचा प्रयत्न त्यांनी का केला? काही ताण तणाव होता का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांना तात्काळ लातूरच्या सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच लातूरचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे तसेच अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाकडे आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचारी यांनी रुग्णालयामध्ये येत आयुक्तांच्या प्रकृतीबाबत विचारपूस केली होती. भाजप नेते डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, अनेक माजी नगरसेवक यांनी रुग्णालयात भेट देत आणि त्यांच्या प्रकृतीबाबत जाणून घेतलं.बाबासाहेब मनोहरे यांनी मराठवाड्यातील धाराशिव, नांदेड वागला मनपा आणि लातूर या ठिकाणी काम केलं आहे. नांदेड येथे अतिरिक्त मनपा आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं. त्यानंतर लातूर येथे आयुक्त म्हणून ते कार्यरत आहेत. अतिशय स्पष्टवक्ते असलेल्या आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी आत्महत्या सारखा विचार का करावा हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. लातूर पोलीस पुढील तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.