त्यापूर्वीच फडणवीस होतील पायउतार; संजय राऊतांचं मोठं विधान, पुण्यातील घटनेवरुन केली टीका.

गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला संघाचा आशीर्वाद असल्याने रुग्णालयावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. दहा लाख रुपयांसाठी गर्भवती महिलेच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला संघाचा आशीर्वाद असल्याने रुग्णालयावर कोणतीही कारवाई होणार नाही, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

रुग्णालय विरोधामध्ये होणाऱ्या आंदोलनाला ‘शो’ म्हटले जाते असा भंपक कारभार राज्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे शरद पवार, शंकरराव चव्हाण, सुधाकर नाईक, मनोहर जोशी यांच्यासारख्या मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीपर्यंत आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचू शकत नाही असे सांगत त्याआधीच फडणवीस पायउतार होतील, अशी टीका राऊत यांनी केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये होणाऱ्या शिबिराचा आढावा घेण्यासाठी राऊत शनिवारी दौऱ्यावर होते. यावेळी राऊत यांनी भाजप, शिंदे यांची शिवसेना व मनसेवर टीका केली. वक्फ विधेयकांवरून खासदार असदुद्दीन ओवैसींवर टीका करणाऱ्या शिंदे यांचे खासदार आणि ओवैसी एकाच ठिकाणी बसून चहा पित असल्याचे एका छायाचित्रात दिसत आहे. यात दुसरे कुणी असते तर, हिंदू धोक्यात आला असता, अशी टीका शिंदेसेनेने केली असती, असे ते राऊत म्हणाले.मराठी भाषेवरून मनसेचे आंदोलन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरस्कृत असल्याची टीका खासदार राऊत यांनी केली. मराठीचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने घेतला असून, आम्ही केवळ कानफाटामध्ये मारून व मारामारी करून थांबलो नाही, तर स्पर्धा परीक्षेच्या युगामध्ये मुलांना तयार करण्याचे प्रयत्न केले. किरकोळ शिपायाच्या कानफाटात मारून काही होत नाही. ज्यांच्या हातात निर्णय घेण्याची क्षमता, जो प्रमुख त्याच्या कानफाटात मारले पाहिजे. शिपाई, चहा देणाऱ्याला मारहाण करून काय उपयोग? असा सवाल राऊत यांनी केला.

  • Related Posts

    हॉट एअर बलूनची दोरी तुटली; कामगार 100 फुटांवरुन कोसळला; भयंकर दुर्घटनेत करुण अंत.

    जिल्ह्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात मोठी दुर्घटना घडली. हॉट एअर बलून शो सुरु असताना एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. वासुदेव खत्री असं मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे.जिल्ह्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित समारंभात मोठी…

    भाविकांची अलोट गर्दी, नियोजन चुकलं अन् सप्तश्रृंगीगडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, लोकांमध्ये संताप.

     नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. गुरुवारी पहाटे अचानक भाविकांची गर्दी वाढल्याने चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती उद्भवल्याचं पाहायला मिळालं.नाशिकातील सप्तश्रृंगी गडावर भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    हॉट एअर बलूनची दोरी तुटली; कामगार 100 फुटांवरुन कोसळला; भयंकर दुर्घटनेत करुण अंत.

    हॉट एअर बलूनची दोरी तुटली; कामगार 100 फुटांवरुन कोसळला; भयंकर दुर्घटनेत करुण अंत.

    भाविकांची अलोट गर्दी, नियोजन चुकलं अन् सप्तश्रृंगीगडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, लोकांमध्ये संताप.

    भाविकांची अलोट गर्दी, नियोजन चुकलं अन् सप्तश्रृंगीगडावर चेंगराचेंगरीची परिस्थिती, लोकांमध्ये संताप.

    वाल्मिक कराडने मागवली कागदपत्रे, अर्जामध्ये केला मोठा दावा.

    वाल्मिक कराडने मागवली कागदपत्रे, अर्जामध्ये केला मोठा दावा.

    ना दुसऱ्या प्रकरणात खटला, ना अन्य कोणाला सोपवता येणार; राणाचं प्रत्यार्पण कोणत्या अटींवर?

    ना दुसऱ्या प्रकरणात खटला, ना अन्य कोणाला सोपवता येणार; राणाचं प्रत्यार्पण कोणत्या अटींवर?