अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण! कोर्टाचा मोठा निकाल; PI कुरुंदकर दोषी, हत्या करुन मृतदेहाचे तुकडे खाडीत फेकलेले.

 सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यासह कुंदन भंडारी आणि महेश फळणीकर या तिघांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश के.जी. पालदेवार यांनी शनिवारी दोषी ठरवले. बिद्रे हत्याकांड हे दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचे मत नोंदवत न्या. पालदेवार यांनी या तिघांना ११ एप्रिल रोजी शिक्षा ठोठावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या हत्या प्रकरणातील आरोपी राजू पाटील याची मात्र न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.

आरोपी अभय कुरुंदकर याने अश्विनी बिद्रे यांची निर्घृण हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते भाईंदरच्या खाडीत टाकून पुरावे नष्ट केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी स्वत: एक पोलिस अधिकारी असल्यामुळे त्याने आपल्या कौशल्याचा वापर करून सगळे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे तसेच त्याने बनावट रेकॉर्ड तयार करून वरिष्ठांची दिशाभूल केल्याचे परिस्थितीजन्य पुराव्यातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे कुरुंदकर याच्याविरुद्ध हत्या, बनावट रेकॉर्ड तयार करणे व वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी गुन्हा सिद्ध झाल्याचे न्या. पालदेवार यांनी स्पष्ट केले.अश्विनी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुरुंदकर याचा चालक कुंदन भंडारी याने गोणी आणून त्यात मृतदेहाचे तुकडे भरले. कुरुंदकर याचा मित्र महेश फळणीकरने गोणीत भरलेला अश्विनीचा मृतदेह भाईंदरच्या खाडीत टाकण्यास मदत केली.तसेच भाईंदरच्या ज्या घरात कुरुंदकरने अश्विनीचे तुकडे केले, तेथे भिंतीवरील रक्ताचे डाग पुसण्यासाठी कुंदन भंडारीने ते रंगवून घेतले. अश्विनीच्या शरीराचे तुकडे नेलेल्या गाडीची रंगरंगोटी करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने कुंदन भंडारी व महेश फळणीकर यांना पुरावा नष्ट करण्यास मदत केल्याबद्दल दोषी ठरवले.

  • Related Posts

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    कन्हैया कुमार यांना पोलिसांनी अटक केली आहे. बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया कुमार पदयात्रा करत होते.बिहारमध्ये बेरोजगारी आणि स्थलांतराच्या विरोधात काँग्रेसचे नेते एनएसयुआयचे प्रभारी कन्हैया…

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मिळाला आहे. आज त्याची कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून सुटका झाली.कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या, त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांना अटक, बिहारमध्ये सुरू होती पदयात्रा, ताब्यात घेण्याचं कारण काय?

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    कोरटकरवर हल्ल्याची भीती, पोलिसांनी मीडियाच्या गाड्या रोखल्या; ‘त्या’ बातमीनं सगळ्यांनाच चकवा.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

    देवाला बकरा देण्यास निघाले, कारला भीषण अपघात; चौघे देवाघरी, पण बकऱ्यालाच देव पावला.

    मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले…

    मंगेशकर कुटुंब लुटारूंची टोळी म्हणणाऱ्या वडेट्टीवारांना दादांचं उत्तर, म्हणाले…