महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज आहेत. उदंड झाली खाती, पण त्या खात्यांमध्ये अधिकार नेमके किती, अशी राज्यमंत्र्यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातत ६ राज्यमंत्री आहेत. प्रत्येकाकडे ६ खाती आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार दिलेले नाहीत.महायुती सरकारमधील राज्यमंत्री नाराज आहेत. उदंड झाली खाती, पण त्या खात्यांमध्ये अधिकार नेमके किती, अशी राज्यमंत्र्यांची अवस्था आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ६ राज्यमंत्री आहेत. प्रत्येकाकडे ६ खाती आहेत. पण त्यांना कॅबिनेट मंत्र्यांनी अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे राज्यमंत्रिपद केवळ शोभेपुरतं आणि दाखवण्याकरता असल्याची भावना राज्यमंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये व्यक्त होत आहे.राज्यमंत्र्यांचाही सन्मान राखला जाईल अशा पद्धतीनं त्यांना अधिकार प्रदान करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या होत्या. कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना अधिकार न दिल्यास, मीच राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करेन, असंही फडणवीस म्हणाले होते. त्यानुसार काही कॅबिनेट मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना कोणकोणते अधिकार दिले याचं परिपत्रक काढलं. त्यातून राज्यमंत्र्यांना अतिशय किरकोळ अधिकार देण्यात आल्याचं स्पष्ट झालं.










