कल्याण शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या प्रसुतीगृहात उपचारा दरम्यान एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आहे.दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला असल्याचे प्रकरण ऐरणीवर असतानाच कल्याण (Kalyan) शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे.कल्याण डोंबिवली महापालिकेच्या (KDMC) कल्याण पूर्वेतील शक्तीधाम प्रसूतीगृहात शांतीदेवी अखिलेश मौर्य (वय ३०) या महिलेचा गर्भपात आणि कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी दाखल करण्यात आले होते. तिची शस्त्रक्रिया करण्यापूर्वीच तिची प्रकृती खालावली. तिला इंजेक्शन दिले गेले. तिला प्रसूतीगृहातून खाजगी रुग्णालयात नेत असताना तिचा वाटेत मृत्यू झाला. महिलेच्या मृत्यूस प्रसूतीगृहातील डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप महिलेच्या पतीसह तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
धक्कादायक म्हणजे प्रसूती गृह असलेल्या या रुग्णालयात आयसीयु नसल्याचे देखील माहिती समोर आली आहे.केडीएमसीच्या डॉक्टरांनी आम्ही कोणताही हलगर्जीपणा केला नाही, पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे सांगितले.माझ्या पत्नी शांती देवी मोर्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी इथे आलो होतो.मला सकाळपासून येथे येऊ दिले नाही. आणि अचानक तीन वाजता शस्त्रक्रिया सुरू केली. मात्र ती शस्त्रक्रिया झालीच नाही. इंजेक्शनमुळे पत्नीचा मृत्यू झाला. मृत्यूसाठी जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी इतकीच मागणी मी करू शकतो.दरम्यान दोन महिन्यापूर्वी महापालिकेच्या डाेंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात सुवर्णा सरोदे या गरोदर महिलेचा प्रसूती दरम्यान मृत्यू झाला होता.









