किरकोळ वादातून संसाराची राखरांगोळी! स्वत:ला पेटवून घेत पत्नी-सासूला मारली मिठी; पतीचा मृत्यू.

पतीने स्वत:ला पेटवून घेत पत्नी व सासूला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सोनारी येथे रविवारी (दि.६) मध्यरात्रीच्या सुमारास घडला.नात्याने मावस भाऊ-बहीण असलेल्या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यामुळे दोघांच्याही घरच्यांचा या विवाहाला विरोध होता. अशातच पती-पत्नीत किरकोळ वाद झाल्याने माहेरी आलेल्या पत्नीला चार मित्रांसह पळवून नेण्याच्या उद्देशाने पती दाखल झाला. त्याने सासूरवाडीत पत्नी व सासूशी वाद घातले.त्यानंतर स्वत:ला पेटवून घेत पत्नी व सासूला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील सोनारी येथे रविवारी (दि.६) मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या पतीचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी (दि.७) दुपारी मृत्यू झाला, तर त्याची पत्नी व सासू गंभीर जखमी असून त्यांच्यावर नाशिकमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी मयत पती व त्याच्या चार मित्रांविरोधात सिन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

केदारनाथ दशरथ हांडोरे (वय २४, रा. शिंदेवाडी ता. सिन्नर) असे मृत पतीचे नाव आहे. केदारनाथ व स्नेहल सोमनाथ शिंदे (वय १९) यांचा गेल्यावर्षी प्रेमविवाह झाला. गेल्या काही दिवसांपूर्वी स्नेहल व केदारनाथ यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे स्नेहल माहेरी सोनारीला आली होती. रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास केदारनाथ त्याच्या मित्रांसोबत सोनारी येथे आला. स्नेहल व तिची आई अनिता यांच्यासोबत केदारनाथने वाद घालत चाकूचा धाक दाखवून स्नेहलला पळवून नेण्याचा प्रयत्न केला.

मात्र, पत्नीला पळवून नेण्याचा प्रयत्न फसल्याने संतप्त केदारनाथने स्वत:ला ज्वलनशील पदार्थाच्या साह्याने पेटवून घेत पेटलेल्या अवस्थेतच स्नेहल व सासू अनिता सोमनाथ शिंदे यांना मिठी मारली. यात स्नेहल व अनिता शिंदे याही गंभीररित्या भाजल्या गेल्या.केदारनाथ याने आपल्या पत्नीला पळवून आणण्यासाठी पंचाळे येथील सराईत गुन्हेगार विशाल तुपसुंदर, मावस भाऊ कृष्णा थोरात, गणेश थोरात, हरीश डुंबरे या चौघांची मदत घेतली. पैकी विशाल तुपसुंदर हा तडीपार असल्याचे समजते. या चौघांपैकी तिघांना सिन्नर पोलिसांनी काल संध्याकाळी ताब्यात घेतले होते. आणखी एकाचा शोध सुरू आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.