बांगलादेशमधील लोकांनी बाटा शोरूमध्ये घुसून पूर्ण दुकान लुटलं, अगदी टेबल, खुर्च्या, लाईट्स, एवढंच काय तर दुकानाच्या पाटीमधील बल्ब सुद्धा सोडले नाहीत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीच सांगा अशा लोकांना कुठली शिक्षा केली पाहिजे?काही दिवसांपूर्वी पाकिस्तानमध्ये लोकांनी मिळून शॉपिंग मॉल लुटल्याचे व्हिडीओ समोर आले होते. त्यावेळी पाकिस्तानी लोकांची जगभरात खिल्ली उडवली गेली. अन् आता असाच काहीसा प्रकार बांगलादेशमध्ये घडला आहे. तेथील लोकांनी केएफसी चिकन आणि बाटाचे शोरूम लुटले. या घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. लोकं अक्षरश: शोरूममध्ये शिरून हजारो रुपयांचे शूज, चपला आणि सोबतच टेबल आणि खूर्च्या देखील पळवून नेताना दिसत आहेत. बरं, तसाच प्रकार KFC स्टोअर्समध्ये घडलाय.










