करोना काळात अनेकांचा जीव गेला. महामारीत अनेकांनी त्यांचे आप्त गमावले. काहींच्या नशिबी तर अंत्यसंस्कारही नव्हते. अंत्यसंस्कार प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे.टोकियो: करोना काळात अनेकांचा जीव गेला. महामारीत अनेकांनी त्यांचे आप्त गमावले. काहींच्या नशिबी तर अंत्यसंस्कारही नव्हते. अंत्यसंस्कार प्रत्येक व्यक्तीचा अधिकार आहे. असं म्हणतात, अंत्यसंस्काराशिवाय एखाद्या व्यक्तीला मुक्ती मिळत नाही. माणुसकीच्या नात्यानं अनोळखी व्यक्तींवरही अंत्यसंस्कार केले जातात. पण जपानमधील एका व्यक्तीची कहाणी यापेक्षा वेगळी आहे. त्यानं वडिलांचा मृतदेह तब्बल २ वर्षे घरातील कपाटात लपवून ठेवला. कारण त्याच्याकडे वडिलांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पैसे नव्हते. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.५६ वर्षांच्या नोबुहिको सुझुकी टोकियोत एक चिनी रेस्टॉरंट चालवत होते. आठवड्यापासून त्यांनी रेस्टॉरंट उघडलं नाही.










