पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे, ज्यामुळे पाकिस्तानची संघर्षशील अर्थव्यवस्था आणखी संकटात सापडली आहे. सिंधू जल करार स्थगित करणे आणि द्विपक्षीय व्यापार थांबवणे यासारख्या भारताच्या कठोर उपाययोजनांमुळे पाकिस्तानच्या शेअर बाजाराला मोठा तोटा झाला.मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. 26 निष्पाप पर्यटकांचा बळी घेणाऱ्या भयानक दहशतवादी हल्ल्यांवर कठोर भूमिका घेत भारत सरकारने अनेक ॲक्शन घेतले ज्यामुळे पाकिस्तानला, विशेषतः अडचणीत असलेल्या अर्थव्यवस्थेला फटका बसणार आहे. पाकिस्तान शेअर बाजार धडाम पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भारताची भीती स्पष्टपणे दिसून येत होती. या हल्ल्यानंतर भारत सरकारने अलीकडेच घेतलेल्या निर्णयांचा परिणाम पाकिस्तानच्या शेअर बाजारात दिसून आला आणि सुमारे एका आठवड्यात KSE100 मध्ये 4.50 टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. यासह भारताने गोळी न चालवताच पाकिस्तानचे 70 हजार कोटी बुडवून बदला घेतला.










