बीड जिल्ह्यात एका तरुणाने आयुष्य संपवलं, मुलाच्या जाण्याने दुःखी झालेल्या आईनेही विष प्राशन करून आपलं आयुष्य संपवलं. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील वाहेगाव आमला येथे अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. एका तरुणाने आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं. तरुणाच्या आत्महत्येनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लेकाच्या अशा अचानक जाण्याने आईला अतिशय दु:ख झालं. तिला आपल्या मुलाचा विरह सहन होत नव्हता. लेकाच्या जाण्याने कोलमडलेल्या आईनेही प्रचंड दुःखातून आत्महत्येचा मार्ग पत्करला.लेक आणि आई या दोघांच्या एकामागे एक आत्महत्येच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.










