गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन;प्रशासनाचा कारवाईकडे कानोडोळा!

गौण खनिजाचे बेसुमार उत्खनन;प्रशासनाचा कारवाईकडे कानोडोळा!जामनेर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीने गौण खनिज उत्खनन सुरू आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाला तक्रार केल्यानंतरही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत नसल्याची प्रकरण नागरिकांकडून केली जात आहे. गौण खनिजाचे अवैध उत्खनन सुरू असल्याने शासनाच्या लाखो रूपयांच्या रॉयल्टी वसुलीवर मोठा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.जामनेर तालुक्यातील खादगाव च्या परिसरातील रस्त्यावर डोंगराळ भागातून दिवसा अवैध पद्धतीने गौण खनिज (मुरूम) ची चोरी सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पोकलँड आणि च्या साह्याने उत्खनन सुरू आहे. या संदर्भात मंडळ अधिकारी भाऊसाहेब डोंगरे , जामनेर तहसीलदार नानासाहेब आगळे यांना माहिती जे तक्रार करण्यात आली होती. मात्र पाच दिवस उलटून देखील प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

सोबतच आधी संबंधित उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे रीतसर परवानगी आणि सर्व पावत्या असल्याची माहिती प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती मात्र याची पडताळणी केल्यानंतर उत्खनन करणाऱ्या व्यक्तीकडे कोणतीही परवानगी नसल्याची बाब उघड झाली आहे. या सगळ्यानंतर तहसील प्रशासन किंवा मंडळ अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन देऊन देखील अद्याप पर्यंत कोणतीही कारवाई केलेली नाही. तसेच कारवाई बाबत मंडळ अधिकाऱ्यांना वारंवार विचारणा करुन देखील माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे करणाऱ्यांना प्रशासनाचा अभय आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.गौण खनिज उत्खनन करावयाचे असल्यास ते किती करावे यासाठीचे निकष महसूल विभागाकडून घालून दिले आहेत. शहरात बांधकामांनी जोर पकडला आहे. या बांधकामांसाठी उत्खनन करण्याकरिता तहसील कार्यालयातून प्रती ब्रास ६०० रुपये रॉयल्टी भरुन परवानगी दिली जाते.

परंतु याचेही शहरात सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव आहे. या सर्व प्रकाराकडे जिल्हाधिका-यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी यावर प्रतिक्रिया देण्यासाठी प्रतिसाद दिला नाही.संबंधित गौण खाणी उत्खनन करणाऱ्या व्यक्तीने गौण खनिज उत्खनन परवानगी घेतलेली आहे का? घटनास्थळी किती उत्खनन केले याची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करुन प्रशासनाकडून माहिती घेतली जाणार का? आणि अटी-शर्तींचे उल्लंघन झाले असेल तर पुढील कार्यवाही होईल का असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.