पूजा करताना दिव्याची पेटती वात पडली अंगावर आणि उडाला भडका, डोंबिवलीतील खळबळजनक घटना.

डोंबिवलीत एक दु:खद घटना घडली. अर्चना धर्मेंद्र कुमार या देवपूजा करत असताना, दिव्याची वात अंगावर पडल्याने त्या गंभीररित्या भाजल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.घरात देवाची पूजा करत असताना दिव्याची पेटती वात अंगावर पडून डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागातील एक महिला गंभीररित्या भाजली. या महिलेवर जवळच्या आणि त्यानंतर डोंबिवली एमआयडीसीतील एका रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. परंतु, ही महिला गंभीररित्या भाजली असल्याने उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला. शनिवारी ही घटना घडली आहे. अर्चना धर्मेंद्र कुमार (४८) असे मयत महिलेचे नाव आहे.

दरम्यान या मृत्युप्रकरणी महिलेचा पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेत पुढील तपास चालू केला आहे. या घटनेने मोठी खळबळ उ़डालीये. मृत महिलेचे पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी अर्चना कुमार ही शनिवारी सकाळी घरात देवपूजा करत होती. देव पुजा झाल्यानंतर अर्चना दिवे तयार करून ती देवांना ओवाळत होती. यावेळी दिव्यातील पेटती वात बाहेर पडून ती अर्चनाच्या अंगावर पडली.यावेळी तिच्या अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. तलमलीत कपडे असल्याने कपडयांनी वेगाने पेट घेतला. अर्चनाला स्वत:ला वाचवण्यासाठी संधीच मिळाली नाही. त्यामुळे अंगावरील कपडे पेटल्याने अर्चनाचे शरीर भाजले गेले.

तिला तातडीने कल्याण पूर्वेतील काका ढाबा परिसरातील जानकी ग्लोबल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने तेथील डॉक्टरांनी अर्चना यांना अधिकच्या उपचारासाठी इतर ठिकाणी दाखल करण्याची सूचना दिलीये.डोंबिवली एमआयडीसीतील डॉक्टर मिलिंद शिरोडकर यांच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्याची सूचना केली. अर्चना यांना तेथून तातडीने उच्च उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. एम्स रुग्णालयात डॉक्टरांनी अर्चना यांच्यापूजा करताना दिव्याची पेटती वात पडली अंगावर आणि भडका उडाला, बचावासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु, अर्चना यांची प्रकृती अधिकच बिघडत गेली. त्यांनी उपचारासाठी प्रतिसाद देणे बंद केले. एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.