आप नेत्याच्या मुलीचा कॅनडात मृत्यू, चार दिवसांपासून बेपत्ता वंशिकाची बॉडी समुद्रकिनारी सापडली.

आप नेते देविंदर सिंग यांची मुलगी कॅनडात मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. ती कॅनडात शिक्षण घेत होती. गेल्या चार दिवसांपासून ती बेपत्ता होती, त्यानंतर ती समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळून आली.कॅनडामध्ये पुन्हा एकदा एका भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूची घटना समोर आली आहे. येथील ओटावा येथे एका भारतीय विद्यार्थीनीचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळून आला आहे. ही विद्यार्थिनी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता होती. ओटावा येथील सुमुद्रकिनारी तिचा मृतदेह आढळून आला आहे. पंजाबचे आप नेते पक्षाचे नेते देविंदर सिंग यांची मुलगी वंशिकाचा गूढ मृत्यू झाल्याची माहिती आहे. 21 वर्षांच्या वंशिकाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर पडलेला आढळून आला. कॅनडातील भारतीय दूतावासानेही या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
वंशिका ही आम आदमी पार्टीचे नेते देविंदर सिंग यांची मुलगी आहे. ती पंजाबमधील डेरा बस्सीची रहिवासी आहे. पंजाबचे आपचे आमदार कुलजीत सिंग हे देविंदर सिंग यांच्या जवळचे मानले जातात.

टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, वंशिकाने अडीच वर्षांपूर्वी तिचे शालेय शिक्षण पूर्ण केले, त्यानंतर ती पुढील शिक्षणासाठी कॅनडाला गेली.ती कॅनडातील ओटावा येथे डिप्लोमाचे शिक्षण घेत होती. मात्र 25 एप्रिलला वंशिका अचानक बेपत्ता झाली. पोलिसांनी तपास सुरू केला असता, तिचा शोध घेतच होते तोच त्यांना वंशिकाचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर पडलेला आढळून आला.कॅनडातील भारतीय दूतावासाने वंशिकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. घटनेची माहिती देताना भारतीय दूतावासाने म्हटलं की- आम्हाला आपणास कळविण्यास अत्यंत दु:ख होत आहे की, ओटावा येथील भारतीय विद्यार्थिनी वंशिकाच्या मृत्यूची बातमी आम्हाला मिळाली आहे. हे प्रकरण संबंधित अधिकाऱ्यांकडे मांडण्यात आले असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही स्थानिक समुदाय संघटनांच्या जवळच्या संपर्कात आहोत. आमच्याकडून कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल.

वंशिका 25 एप्रिलला रात्री 8-9 वाजताच्या सुमारास 7 मॅजेस्टिक ड्राइव्ह, ओटावा येथील घरातून बाहेर पडली. वंशिका भाड्याचे घर पाहण्यासाठी गेली होती. मात्र, 11:40 वाजता तिचा फोन अचानक बंद झाला. घरच्यांना वंशिकाची काळजी वाटू लागली. त्यामुळे याबाबतची माहिती ओटावा पोलिसांना देण्यात आली.वंशिका बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला, मात्र वंशिका कुठेच सापडली नाही. त्यानंतर तिचा मृतदेह समुद्रकिनाऱ्यावर संशयास्पद स्थितीत आढळून आला. वंशिकाच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.