महाराष्ट्र दिनी रायगडमध्ये आदिती तटकरे झेंडावंदन करणार, भरत गोगावले समर्थक भडकले; म्हणाले, पालकमंत्री नसताना…

आदिती तटकरेंना झेंडावंदनाची संधी मिळताच भरत गोगावले समर्थक चांगलेच भडकले आहेत.रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे जिल्हा मुख्यालयावर महाराष्ट्र दिनी  होणाऱ्या मुख्य  झेंडावंदनाचा मान पुन्हा एकदा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना दिल्याने शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) नाराजीचा सूर पसरला आहे. आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडमधील मंत्री भरत गोगावले (Bharat Gogawale) समर्थकांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 18 जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार, नाशिकसाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र, या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचे समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी थेट मुंबई-गोवा महामार्गावर उतरून टायर जाळत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचप्रमाणे, नाशिकमध्येही मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी आपली तीव्र नाराजी व्यक्त केली. या वाढत्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर, अवघ्या 24 तासांत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत घेतलेल्या निर्णयाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. महायुतीत अजूनही नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असून महाराष्ट्र दिनाच्या झेंडावंदन कार्यक्रमावरून रायगडमध्ये राजकीय वातावरण तापले आहे.

दोघांनाही समान संधी देणे आवश्यक : सुरेश महाडिक आदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने रायगडचे शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय काय होईल , कधी होईल तेंव्हा होईल पण यावेळी ध्वजारोहणाचा मान भरत गोगावले यांनाच मिळाला पाहिजे अशी मागणी रायगडचे शिंदेंच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुरेश महाडिक यांनी केलीय. दोघांकडेही मंत्रीपद असताना हा न्याय दोघांना समान देणे गरजेचे असून अस न झाल्यास आमचा राग अनावर होईल आणि याला सर्वस्व जबाबदार सुनील तटकरे असतील, असा टोला त्यांनी खासदार सुनिल तटकरे यांना नाव न घेता लगावला आहे. पालकमंत्री भरत शेठच व्हावे संपूर्ण रायगडची इच्छा : महेंद्र दळवी तर आमदार महेंद्र दळवी यांनी म्हटले आहे की, मध्यंतरी आदित्य तटकरे यांच्या पदाला स्थगिती दिली होती.  आम्ही उठाव केला होता त्यामुळे स्थगिती दिली.  भरत शेठच्या रूपाने पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे. त्यांना ध्वजारोहणाचा मान मिळणं हे योग्य नाही. कुठेतरी आमच्यावर अन्याय होत आहे. आम्ही उद्या रायगड कार्यकारिणीची बैठक लावली आहे. माझी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, एकदाचा पालकमंत्रीपदाचा निर्णय घ्या. रायगडवर अन्याय का? उद्या कार्यकारिणीची बैठक घेऊन एक तारखेला याचा नक्कीच विरोध करणार आहोत. जनतेने आम्हाला जनाधार दिला आहे. संपूर्ण रायगडची इच्छा आहे की, पालकमंत्री भरत शेठच व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आणि रायगडच्या लोकांची भूमिका त्यांच्यापुढे मांडणार आहे.  मला विश्वास आहे की, वरिष्ठ पातळीवरून भरत गोगावले यांना पालकमंत्री घोषित केले जाईल. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमाला आमचा विरोध राहणार असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जळगावमध्ये बौद्ध समाजाचा भव्य ‘मोफत’ सामूहिक विवाह सोहळा; वधू-वरांना मिळणार ३० हजारांचे अनुदान.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.

    जि. प. शिक्षिका शिंगटे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर.