कामटवाडे परिसरात अल्पवयीन तरुणाची पाच ते सहा जणांच्या टोळक्याकडून डोक्यात दगड व फर्शी घालून निघृण हत्या करण्यात आली होती.अंबड पोलीस ठाण्याच्या (Ambad Police Station) हद्दीतील कामटवाडे (Kamatwade) परिसरात करण उमेश चौरे (वय 17, रा. संत कबीर नगर) या युवकाची सोमवारी (दि. 28) दुपारी दोनच्या सुमारास पाच ते सहा जणांच्या टोळक्याने डोक्यात दगड व फर्शी घालून निघृण हत्या करण्यात आली होती. जुन्या वादातूनच ही हत्या झाली असल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात होता. गुन्हे शोध पथकाच्या युनिट-1 ने याप्रकरणी दोन विधी संघर्षित बालकांसह तिघांना ताब्यात घेतले होते. आता आरोपींच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मयत करण चौरे याच्यावर गंगापूर हद्दीतील अरुण बंडी याच्या खुनाच्या गुन्ह्यात सामील असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते.










