पंतप्रधान मोदींकडे प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केलीय.जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असून दोन्ही देशांमध्ये कोणत्याही क्षणी युद्ध होण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी भारत आणि पाकिस्तान (Pakistan Army) दोन्ही बाजुंकडून सीमारेषेवर सैन्याची जमवाजमव सुरु आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना, दोन्ही देशांच्या लष्कराने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरे केल्या असताना दुसरीकडे पाकिस्तान मधील एका नेत्याने मोठे विधान करत पाकिस्तानला सावधतेचा इशारा दिला आहे. भारताकडून मोठ्या हल्ल्याची पाकिस्तानने तयारी ठेवली पाहिजे. भारत कधीही जोरदार हल्ला करू शकतो. शिवाय देशातील नागरिकांचा संताप पाहता पंतप्रधान मोदींकडे (Narendra Modi) प्रत्युत्तर देण्याशिवाय पर्याय नसल्याचे मत व्यक्त करत पाकिस्तानचे माजी माहिती प्रसारण मंत्री फवाद हुसैन चौधरी (Fawad Hussain Chaudhry) आपल्याच देशाला सतर्कता बाळगण्याची सूचना केली आहे.










