कलिंगड विक्रेत्याच्या मोबाईलमध्ये आढळले नवजात बालकांचे फोटो आणि त्यांच्या किंमती, मोठ्या रॅकेटचा संशय, Badlapur मध्ये खळबळ.

 अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. या भागात फळविक्रीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून वन विभागाच्या हद्दीत कचरा टाकला जात होता. याबाबत वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित कलिंगड विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावले होते. मात्र कचरा टाकणाऱ्या व्यक्तीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत त्याचे चित्रफीत काढत ती व्हायरल केली होती.नवजात बालकांच्या(Newborn Babies) खरेदी-विक्रीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रबदलापुरातकरणात बदलापूर पोलिसांनी एका २४ वर्षीय कलिंगड विक्रेत्या व्यक्तीला अटक केली आहे. वन विभागाच्या जागेत कचरा टाकण्यावरून कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादातून हे रॅकेट उघड झाले आहे.अंबरनाथ येथील फॉरेस्ट(Forest) नाका परिसरात वनविभागाचे कार्यालय आहे. या भागात फळविक्रीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीकडून वन विभागाच्या हद्दीत कचरा टाकला जात होता. याबाबत वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी संबंधित कलिंगड विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावले होते.

मात्र कचरा टाकणाऱ्या व्यक्तीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत वाद घालत त्याचे चित्रफीत काढत ती व्हायरल केली होती. मात्र याच व्यक्तीने व्हायरल केलेल्या एका चित्रफितीच्या प्रसाराबाबत माहिती घेण्यासाठी विक्रेत्याचा मोबाइल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासला असता, त्याच्या व्हॉट्सअ‍ॅपवर नवजात बालकांचे फोटो आणि त्यांच्यासोबत काही किंमती लिहिलेल्या पोलिसांना आढळल्या.यासोबतच किंमतींबाबत झालेली संभाषणेही समोर आली. हे सर्व संशयास्पद वाटल्याने वन अधिकारी वाळिंबे यांनी तात्काळ बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार नोंदवली. यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी वलीवली येथे राहणारा तुषार साळवे ( २४) या आरोपीला अटक केली. आरोपीच्या मोबाइलमध्ये बालकांच्या खरेदी-विक्रीशी संबंधित संदेश आढळले असून, प्रत्यक्ष व्यवहार पकडला गेला नसला तरी या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिस शोध घेत आहे. तर आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे.दुसरीकडे, घरासमोर खेळणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सुरक्षारक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना कांदिवली परिसरात घडली. या प्रकरणी एका सुरक्षारक्षकाला समतानगर पोलिसांनी अटक केली. कांदिवली परिसरात राहणारी अल्पवयीन मुलगी घराबाहेर खेळत होती. एकटीला पाहून सुरक्षारक्षक तिच्याजवळ आला आणि अश्लील चाळेकरू लागला. तिने विरोध करताच सुरक्षारक्षकाने तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी समतानगर पोलिसांनी पोक्सो तसेच इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून सुरक्षारक्षकाला अटक केली.

  • Related Posts

    राजकारण सोडून घरी बसू, पण शिवसेना सोडणार नाही; ठाकरेंच्या 4 बड्या मोहऱ्यांचा नाशकात निर्धार.

    विधानसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसाठी नवी उभारी देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच नाशिकमध्ये शिबिर घेत आहेत.एकवेळ राजकारण सोडून घरी बसू.…

    स्पर्धा परीक्षा आंदोलनाला क्लासकडून फूस? क्लासचालकांची पोलिसांनी घेतली शाळा .

    शहरातील अभ्यासिका आणि कोचिंग क्लासची संख्या गेल्या काही वर्षांत वाढली आहे. या अभ्यासिका, क्लास सुरू करताना त्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या ‘फायर एनओसी’सह इतर परवानग्या घेतलेल्या आहेत का, संबंधित ठिकाणी वाहन…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    राजकारण सोडून घरी बसू, पण शिवसेना सोडणार नाही; ठाकरेंच्या 4 बड्या मोहऱ्यांचा नाशकात निर्धार.

    राजकारण सोडून घरी बसू, पण शिवसेना सोडणार नाही; ठाकरेंच्या 4 बड्या मोहऱ्यांचा नाशकात निर्धार.

    स्पर्धा परीक्षा आंदोलनाला क्लासकडून फूस? क्लासचालकांची पोलिसांनी घेतली शाळा .

    स्पर्धा परीक्षा आंदोलनाला क्लासकडून फूस? क्लासचालकांची पोलिसांनी घेतली शाळा .

    पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं.

    पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं; सराव करताना दरदरुन घाम, रुग्णालयात मृत्यू, 4 महिन्यांचं बाळ पोरकं.

    मुंबईत रात्री बाईकस्वाराची लूट, कॅमेरे तपासले, क्ल्यू मिळेना; अखेर कचरा गाडीने गेम फिरवला.

    बालेकिल्ल्यातच काँग्रेसला खिंडार; माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांच्या हाती कमळ.

    बालेकिल्ल्यातच काँग्रेसला खिंडार; माजी नगराध्यक्ष,उपनगराध्यक्षांसह 10 नगरसेवकांच्या हाती कमळ.