भूकंपाने म्यानमार, थायलंड हादरले; दीडशेहून अधिक बळी, ७.७ तीव्रतेच्या भूकंपात इमारती, रस्ते, पूल उद्ध्वस्त.

भूकंपामुळे देशातील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, १४४ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण जखमी झाल्याची माहिती म्यानमारच्या जुंटा लष्करी सरकारने दिली.म्यानमार आणि थायलंड शुक्रवारी ७.७ तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाने हादरले. या दुर्घटनेमुळे म्यानमारमध्ये हाहाकार उडाला असून, १५४ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण जखमी झाले. दुसरीकडे, शेजारच्या बँकॉकमध्ये बांधकामाधीन गगनचुंबी इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळून दहा जणांचा मृत्यू झाला, तर शंभरहून अधिक जण बेपत्ता आहेत. भूकंपाच्या आघातानंतर म्यानमारच्या लष्करशहाने इतर देशांकडे मदतीची याचना केली. भूकंपातील बळींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या मंडाले शहराजवळ होता. तिथे ७.७ तीव्रतेचा भूकंप झाल्यानंतर ६.४ तीव्रतेचा दुसरा हादरा बसला. भूकंपामुळे देशातील अनेक इमारती उद्धवस्त झाल्या असून, १४४ जणांचा मृत्यू झाला, तर ७३० जण जखमी झाल्याची माहिती म्यानमारच्या जुंटा लष्करी सरकारने दिली. देशातील मृत आणि जखमींची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचे जनरल मिन आंग हलैंग यांनी सांगितले.बँकॉकमध्ये चातुचक बाजार परिसरातील ३३ मजली बांधकामधीन इमारत भूकंपामुळे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली.

क्रेनच्या साह्याने या इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच ही दुर्घटना घडली आणि परिसरातील नागरिक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळू लागले. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून, १६ जण जखमी झाले. तसेच या इमारतीजवळून १०१ जण बेपत्ता असल्याची नोंद आहे, असे थायलंडचे संरक्षणमंत्री फुमथाम वेच्चाची यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बँकॉकच्या अन्य भागांतील इमारतींमधील नागरिकांनी रस्त्यावर धाव घेतली. भूकंपानंतरच्या हादऱ्यांमुळे या नागरिकांना इमारतीबाहेर थांबण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. भूकंपानंतर मदतकार्यालाही वेग आला असून, उशिरापर्यंत मदतकार्य सुरू होते.भूकंपाचे हादरे इम्फाळ कोलकाताबरोबरच आणि मेघालयच्या पूर्व गारो हिल्स जिल्ह्यापर्यंत जाणवले. कोलकाता आणि परिसरात भूकंपाच्या हादऱ्याची नोंद झाली.

मणिपूरच्या इम्फाळमधील थांगल बाजारात भूकंपाच्या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मणिपूरच्या उखरूलमध्ये दुपारी १.०७ वाजता २.५ तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तत्पूर्वी पूर्व गारो हिल्स जिल्ह्यात दुपारी १.०३ वाजता कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली. मात्र, भारतात भूकंपामुळे जीवित किंवा वित्तहानीची नोंद नाही.म्यानमार आणि थायलंडमधील विध्वंसक भूकंपाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिंता व्यक्त करून दोन्ही देशांना सर्वतोपरी मदतीची ग्वाही दिली. ‘दोन्ही देशांच्या मदतीसाठी भारत तत्पर आहे. त्यासाठी आमच्या यंत्रणांना सज्जतेच्या सूचना दिल्या आहेत, म्यानमार आणि थायलंड सरकारच्या संपर्कात राहण्याचे निर्देश परराष्ट्र मंत्रालयाला दिले आहेत,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

  • Related Posts

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन. धरणगांव तालुका प्रतिनिधी- राजु बाविस्कर, धरणगाव : दिगंबर जैन समाजाची ओळख बनलेले, पितृतुल्य व्यक्तिमत्व, समाजसेवेचा आधारस्तंभ आणि धर्मानुरागी ज्येष्ठ मार्गदर्शक…

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन.

    दिव्यांग विद्यार्थ्यांची सेवा हे व्रत मानावे- डॉ. भावनाताई भोसले दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरेपी सेवा शिबिराचे आयोजन. धरणगाव तालुका प्रतिनिधी-राजु बाविस्कर, धरणगाव : शिक्षकांचे स्थान समाजात अत्यंत मानाचे आहे. ज्ञानदानाचे पवित्र कार्य…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You Missed

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    समता फाउंडेशनमार्फत गरजू महिलांना मदतीचा हात; ५ शिवण मशीनचे वितरण,,

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जनसेवा हीच ईश्वर सेवा; ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची समाजाभिमुख शपथ गजानन पा चव्हाण.

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    जळगाव जिल्हा भाजपच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त ‘प्रबोधन सप्ताह’ उत्साहात साजरा होणार,

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    बोदवड पंचायत समितीसमोर ग्राम रोजगार सेवकांचा एल्गार; प्रलंबित मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलनाचा इशारा.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई; गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.

    दिगंबर जैन समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मोहन (दादा) गांधी यांचे निधन.